सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईत वाढ

सातारा ः जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांसह इतर तालुक्यात कमी अधिक प्रमाणात टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहे. सध्या जिल्ह्यात २३ टँकरद्वारे २५ गावे ३९ वाड्यावस्तींवरील २२ हजार २२ लोकांना पाणी पुरवठा केला जात आहे. पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावूनही जिल्ह्यातील अनेक भागातील पाणीटंचाई कमी झालेली नाही.
Increase in water scarcity in Satara district
Increase in water scarcity in Satara district

सातारा ः जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांसह इतर तालुक्यात कमी अधिक प्रमाणात टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहे. सध्या जिल्ह्यात २३ टँकरद्वारे २५ गावे ३९ वाड्यावस्तींवरील २२ हजार २२ लोकांना पाणी पुरवठा केला जात आहे. पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावूनही जिल्ह्यातील अनेक भागातील पाणीटंचाई कमी झालेली नाही.

जिल्ह्यात पाणीटंचाई वाढत आहे, सध्या जिल्ह्यात २५ गावे ३९ वाड्यावस्तीवरील २२ हजार २२ लोकांना २३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सर्वाधिक जावली तालुक्‍यातील तीन गावे व पाच वाड्यावस्त्यावरील तीन हजार ७७४ लोकांना सहा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाटण तालुक्यात तीन गावे पाच वाड्यावस्तीवरील तीन हजार ६३४ लोकांना पाच टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

माण तालुक्यात चार गावे व १७ वाड्यावस्तींवरील चार हजार ३०७ लोकांना तीन टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्‍यात दोन टॅंकरने तीन गावे चार वाड्यावस्त्यांवरील एक हजार ६७३ लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्‍यातील तीन गावांना एका टॅंकरद्वारे एक हजार ७६३ लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. वाई तालुक्‍यातील दोन गावे, चार वाडीवस्तीला दोन टॅंकरद्वारे दोन हजार ७८७ लोकांना पाणी पुरवठा केला जात आहे.

महाबळेश्वर तालुक्‍यातील चार गावांतील एक हजार ५६६ लोकांना दोन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा तालुक्यातील दोन गावे व चार वाड्यावस्तीवरील ८८९ लोकांना एका टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. कराड तालुक्यात एका गावातील एक हजार ६२७ लोकांना एक टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

संरक्षित पाण्यासाठी जिल्ह्यातील ३६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माणमधील २, खटावमधील १४, कोरेगावमधील १, फलटणमधील २, वाईमधील ४, जावलीमधील ५, महाबळेश्वरमधील ६, सातारामधील एक व कराड तालुक्यातील एका विहिरींचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com