कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढ

कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढ
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढ

सांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने मोठा पाणीसाठा झाला आहे. तालुक्यात दहा लघू व एक मध्यम प्रकल्पापैकी दहा तलांवात आजच्या घडीला ६५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.   तालुक्यात सततच्या दुष्काळामुळे गेली तीन ते चार वर्षे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष आणि डाळिंब शेती धोक्यात आली होती. परिमाणी पाणीटंचाई असल्याने अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या आहेत. तसेच रब्बी आणि खरीप हंगामातील पिकेही वाया गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाण्यावर शेती केली जाते. तालुक्यात शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होता. मात्र, जिल्ह्यात यंदा पावसाला उशिरा सुरवात झाली. परंतू तालुक्यात पावसाने दडी मारली होती.  तालुक्यात परतीचा पाऊस होतो. परंतु परतीचा पाऊस उशिरा सुरू झाला. पण अपेक्षित पाऊस झाला नसल्याने बळिराजा चिंतातूर झाला होता. ऑक्टोबर महिन्यात मॉन्सूनोत्तर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील तलावातील पाणीसाठ्यात  वाढ झाली.  तालुक्यात दहा लघू आणि एक मध्यम प्रकल्प आहे. लांडगेवाडी तलावात २० टक्के पाणीसाठा आहे. इतर तलावांत ६५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीप्रश्न सुटला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती बदलली आहे. तलावात पुरेसा पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. योजनेतून पाण्याची सोय करण्याबाबत शेतकऱ्यांची मागणी  तालुक्यातील तलावात पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी अनेक गावांतील शेतीला या तलावातील पाण्याचा लाभ मिळत नाही. या गावातील शेतीला योजनेच्या माध्यमातून पाण्याची सोय होते. या तालुक्यात टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनचे पाणी दिले जाते. सध्या या दोन्ही उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू नाही. त्यामुळे योजनांचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com