कारंजालाड, जि.
ताज्या घडामोडी
इसापूर धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ
परभणी : यंदा आजवर झालेल्या पावसामुळे जलाशयांमध्ये पाण्याची आवक झाल्यामुळे पैनगंगा नदीवरील इसापूर आणि गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मात्र, पूर्णा नदीवरील येलदरी आणि सिद्धेश्वर धरणांमध्ये आवक झाली असली, तरी अजून जिवंत पाणीसाठा निर्माण झाला नाही. जायकवाडी, माजलगाव, निम्न दुधना प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट सुरू आहे.

रविवारी (ता. ८) सकाळी मराठवाडा -विदर्भाच्या सीमेवरील इसापूर धरणामध्ये ४१.९९ दलघमी (४.३६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. विष्णुपुरी प्रकल्पांमध्ये ३५.४८ टक्के, निम्न मानार प्रकल्पांमध्ये ९.२४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. पैठण येथील जायकवाडी धरणामध्ये १९.५८ टक्के, माजलगाव धरणांमध्ये ०.४८ टक्के, निम्न दुधना प्रकल्पांमध्ये १४.५० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. गोदावरी नदीवरील ढालेगाव येथील बंधाऱ्यामध्ये ११.५६ टक्के, मुद्दगल बंधाऱ्यामध्ये १०.९८ टक्के, डिग्रस बंधाऱ्यामध्ये ३९.१७ टक्के, मुळी बंधाऱ्यामध्ये ९.४१ टक्के, करपरा मध्यम प्रकल्पांमध्ये ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता.
जायकवाडी, माजलगाव, निम्न दुधना प्रकल्पातील जलाशयात गत आठवड्याच्या तुलनेत घट झाली आहे. यंदा आजवर झालेल्या पावसामुळे येलदरी आणि सिद्धेश्वर धरणांमध्ये अनुक्रमे ६.८८६ दलघमी आणि ३.२४८ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. परंतु, उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. डिग्रस, मुळी बंधाऱ्यातील पाणीसाठा स्थिर आहे. परंतु ढालेगाव, मुद्दगल बंधाऱ्यात घट झाली आहे. करपरा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा स्थिर आहे.
मासोळी प्रकल्पामध्ये मृतसाठा शिल्लक आहे. २२ लघु तलावांपैकी तीन तलावांतील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. परंतु सहा तलाव अद्याप कोरडे आहेत. झरी (५४ टक्के), पिंपळदरी (३.७८ टक्के), कवडा (१० टक्के), पाडाळी (२१) टक्के या चार तलावांमध्ये या आठवड्यामध्ये सरासरी ४ टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे.
- 1 of 582
- ››