agriculture news in marathi Increase in water use in dams due to heat in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात उन्हामुळे धरणांतील पाण्याच्या वापरात वाढ

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 मार्च 2021

पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने धरणांतील पाण्याचा वापर वाढला आहे. यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे.

पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने धरणांतील पाण्याचा वापर वाढला आहे. यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. मागील चार महिन्यांत सुमारे ५३.९५ टीएमसी पाणीसाठ्याचा वापर झाला आहे. अजूनही १५९.१८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा मुबलक असल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाई कमी भासेल, अशी शक्यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.

चालू वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाली. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरली. एकूण २१३.१३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. यामध्ये उजनी धरणाचाही समावेश आहे. एक जून रोजी मॉन्सून दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला होता. परंतु, जून व जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे धरणातील पाणी पातळी फारशी वाढलेली नव्हती. मात्र, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये दमदार पाऊस झाला. त्यामुळे जवळपास सर्वच  धरणातून कमीअधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला होता. 

आगामी काळात पाणी टंचाई भासण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. सध्या वरसगाव, पानशेत, पवना, टेमघर, कासारसाई, मुळशी, कळमोडी, आंध्रा, शेटफळ, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर, नाझरे, डिंभे, उजनी अशा सर्वच धरणांत पाणीसाठा मुबलक आहे. परंतु उन्हाचा पारा वाढत असल्याने पाण्याचा वापर वाढत असल्याचे दिसून येते.

धरणनिहाय उपलब्ध पाणी (टीएमसी) 

पिंपळगाव जोगे १.०९, माणिकडोह १.३०, येडगाव १.६०, वडज ०.७८, डिंभे ८.४९, घोड २.९७, विसापूर ०.५०, कळमोडी १.४६, चासकमान ५.१९, भामाआसखेड ६.०३, वडिवळे ०.५५, आंध्रा २.४३, पवना ५.२३, कासारसाई ०.३८, मुळशी ८.१०, टेमघर ०.५१, वरसगाव ९.१४, पानशेत ९.४०, खडकवासला ०.९८, गुंजवणी २.४१,नीरा देवधर ७.७३, भाटघर १७.९३, वीर ५.५९, नाझरे ०.४६, उजनी ३६.५८, चिल्हेवाडी ०.३५.


इतर ताज्या घडामोडी
पूर्व भारताच्या विकासावर भर ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशाचा पूर्व भाग नेतृत्व करत होता,...
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पंढरपुरात...सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना...
बाजारात गर्दी नियंत्रणासाठी नियमांची...नाशिक : कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील...
नेरूर येथे नारळ बागेला आगसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील नेरूर कर्याद नारूर (...
जळगावात बीटी कापसाच्या २५ लाख पाकिटांची...जळगाव :  राज्यात कापूस लागवडीत आघाडीवर...
दर्यापूर बाजार समितीत सोयाबीनला सात...अमरावती : सोयाबीन दरातील तेजीची घौडादौड कायम असून...
मंत्रिमंडळात विदर्भाचे वजन घटलेनागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख आणि वनमंत्री संजय...
नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी कृषी...कोल्हापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
अकोला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना...अकोला : एकीकडे केंद्र, राज्य शासन लाभार्थ्यांच्या...
दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन...परभणी : दर वाढले म्हणून बियाण्यासाठी राखून...
शेतकरी नियोजन पीक ः डाळिंबसध्या बाग ताणावर सोडली आहे. मळद येथील ६० एकर...
महिला शेतकऱ्यांसाठी उत्पादक कंपनीगावपातळीवरील १० शेतकरी महिला किंवा महिला शेतकरी...
सोलापुरात वाढत्या उन्हामुळे शुकशुकाटसोलापूर ः सोलापूर शहर जिल्हयात सध्या उष्ष्णतेची...
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकूनजळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा...
पणन संचालनालयाच्या सूचनांची काटेकोरपणे... नाशिक : पणन संचालनालयाने परिपत्रक काढून सलग तीन...
जलसाठा घटू लागला; ‘गिरणा’ ४७ टक्क्यांवरजळगाव : खानदेशात गेल्या काही दिवसांमध्ये रब्बी,...
कृषी सल्ला :आंबा, काजू, नारळ, वाल,...खरीप हंगामाच्या पिक लागवडीसाठी पूर्वतयारी म्हणून...
नाशिक : गोठेधारकांना परवाना नूतनीकरण...नाशिक : शासनाने ३१ ऑक्टोबर २००३ च्या...
वनशेतीसाठी उपयुक्त शिवणशिवण लाकडाचा उपयोग इंधन, फर्निचर, लॅमिनेटेड बोर्ड...