कोरोनास्थितीचा गैरफायदा : पुणे जिल्ह्यात हार्वेस्टरद्वारे गव्हाच्या काढणी दरात वाढ

पुणे ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने अनेक ठिकाणी गव्हाची काढणी खोळंबली आहे. शेतकरी पारंपरिक पद्धतीएेवजी आता हार्वेस्टरद्वारे मळणीवर भर देऊ लागले आहे. सुरूवातीच्या काळात एकरी अठराशे ते दोन हजार एवढा दर होता. परंतु ‘कोरोना’मुळे शेतकरी अडचणीत आल्यानंतर हार्वेस्टर मालकांनी अचानक दरवाढ करत अडीच ते तीन हजार रूपये आकारणी सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
Increase in wheat harvest rate by harvester
Increase in wheat harvest rate by harvester

पुणे ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने अनेक ठिकाणी गव्हाची काढणी खोळंबली आहे. शेतकरी पारंपरिक पद्धतीएेवजी आता हार्वेस्टरद्वारे मळणीवर भर देऊ लागले आहे. सुरूवातीच्या काळात एकरी अठराशे ते दोन हजार एवढा दर होता. परंतु ‘कोरोना’मुळे शेतकरी अडचणीत आल्यानंतर हार्वेस्टर मालकांनी अचानक दरवाढ करत अडीच ते तीन हजार रूपये आकारणी सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.  

सध्या गहू, ज्वारी काढणीची कामे वेगात सुरू आहे. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने एक एकर गहू काढणीसाठी सुमारे तीन ते चार हजार तर मळणीसाठी अडीच ते तीन हजार रूपयांचा खर्च येतो. मात्र, हेच काम हार्वेस्टरद्वारे अवघ्या अठराशे ते दोन हजार रूपयांत होत असल्याने अनेक शेतकरी हार्वेस्टरद्वारे काढणीवर भर देत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’ विषाणूने शहरासह, ग्रामीण भागात चांगलाच धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

काही मजूर घराबाहेबर निघाल्यास पोलिसांकडून मारहाण करत असल्याने मजूरही घराबाहेर न पडण्याचे पसंत करत आहे. त्यामुळे गहू उत्पादकांपुढे गहू काढणीकरिता चांगल्याच अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यावर पर्याय म्हणून अनेक शेतकरी हार्वेस्टरचा पर्याय शोधू लागले आहेत. त्यातच हार्वेस्टर चालकांकडूनही काढणीच्या दरात वाढ केली आहे.  

पुणे जिल्ह्यातील गव्हाचे सरासरी ६३ हजार ८५४ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ३९ हजार २२७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा जिल्ह्यातील बारामती तालुक्यात सर्वाधिक गव्हाची पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ जुन्नर, इंदापूर, दौंड, पुरंदर या तालुक्यात पेरणी झाली आहे. तर पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली, खेड या तालुक्यात सर्वात कमी गव्हाची पेरणी झाली आहे. पारंपरिक शेतीत गहू काढण्याकरिता लागणारा वेळ पाहता या हार्वेस्टरने केवळ तासाभरात होऊ लागल्याने शेतकरी पसंती देऊ लागला आहे. 

हार्वेस्टरमुळे शेतकरीही आता मजूर लावून वेळ वाया न घालवता कमीत कमी वेळात मळणी करून घरी धान्य आणण्याच्या तयारीत आहेत. या मशीनमुळे आता गव्हाची मळणी झटपट व सोपी झाल्याने शेतकरी या यंत्राच्या सहाय्याने गहू काढत आहे. ‘कोरोना’ विषाणूच्या संक्रमणामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. पुरेशा प्रमाणात डिझेल उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीना सामोरे जावे लागत असल्याची माहिती गहू उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.

माझ्याकडे अडीच एकर गहू होता. आठ दिवसांपूर्वी हार्वेस्टरद्वारे काढणी केली आहे. त्यासाठी एकरी तीन हजार रूपये काढणीसाठी मागत होता. मात्र, त्याला दोन दिवसांपूर्वी दोन हजार रूपयांनी काढणीकरिता तयार झाला होता. आता डिझेलच्या अडचणी येत असल्याने दरात वाढ झाली असेल. - शिरीषकुमार बरमेचा, गहू उत्पादक शेतकरी, शिरूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com