agriculture news in marathi, increased in minimum temperature, Maharashtra | Agrowon

कमाल तापमानात किंचित वाढ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

पुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने राज्यातील बहुतांशी भागात पावसाने दडी मारली आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वातावरणात किंचित उकाडा तयार झाला आहे. त्यामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे ३२.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने राज्यातील बहुतांशी भागात पावसाने दडी मारली आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वातावरणात किंचित उकाडा तयार झाला आहे. त्यामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे ३२.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र मध्य प्रदेशाकडे सरकत असून, ते अतितीव्र होत आहे. यामुळे पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाना, हिमाचल प्रदेश या भागात काही प्रमाणात पावसाचा जोर वाढणार आहे. दक्षिण भारतातील माॅन्सूनची तीव्रता कमी झाल्याने पावसाची तीव्रता कमी झाली आहे. येत्या सोमवार (ता. १०) पर्यंत कोकणातील काही भागांत हलका पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसण्याचा अंदाज आहे. 

कोकणातील काही भागात गुरुवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंत हलक्या सरी बरसल्या. विदर्भातही तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पश्चिम पट्यातील काही भागांत व घाटमाथ्यावर पावसाच्या अधूनमधून पाऊस पडला. पूर्व भाग आणि मराठवाड्यात आकाश निरभ्र होते. काही भागांत अधूनमधून ढगाळ हवामानाची स्थिती तयार होत होती.

गुरुवारी (ता. ६) दिवसभर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आकाश निरभ्र होते. विदर्भातील नागपूर परिसरात हलक्या सरी पडल्या. उर्वरित भागात ढगाळ हवामान असून, अनेक भागांत आकाश निरभ्र होते.  

गुरुवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः 
कोकण ः कणकवली २०, दाभोलीम, फोंडा १०
विदर्भ ः भामरागड २०, बल्लाळपूर, तिरोरा १०
घाटमाथा ः कोयना ४०, शिरगाव, अंबोणे, डुंगरवाडी, कोयना १०


इतर अॅग्रो विशेष
दक्षिण कर्नाटक, तामिळनाडूत मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज (ता....
कोकणात पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रात आलेल्या ‘निसर्ग’...
रविवारपर्यंत मॉन्सूनची आणखी चाल शक्य पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरूवारी...
हमीभाव मिळवून देण्यात केंद्र सरकार...पुणे: केंद्र सरकार गाजावाजा करून हमीभाव जाहीर करत...
शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बियाणे अनुदान...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बियाणे...
साखर कारखान्यांनी लॉकडाउनमध्ये जमा केली...पुणे: लॉकडाउनमधील विविध अडचणींना तोंड देत...
माझा शेतकरी, माझा अभिमान ! ७ ते १३ जून...पुणे : कोरोनाच्या कठिणकाळात जनता घरबंद असताना...
कृषी उन्नती योजनेत ६६ टक्के कपातपुणे: कृषी उन्नती योजना राबविण्यासाठी केंद्र...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
दर्जेदार हळद पावडरीचा शिनगारे यांचा...परभणी जिल्ह्यातील वालूर सारख्या ग्रामीण भागात...
शेतकरी संघटना शुक्रवारी करणार ...नागपूर ः एचटीबिटीला मान्यता मिळावी या मागणीसाठी...
विधानपरिषदेच्या ८ सदस्यांची मुदत समाप्तमुंबई: विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त ८...
चक्रीवादळाच्या तडाख्यात मधूमका भुईसपाटनाशिक: नाशिक, सिन्नर व इगतपुरी तालुक्यांमध्ये १...
सातत्य, चिकाटी, प्रयत्नांतून...कोणताही व्यवसाय यशस्वी करायचा तर सातत्य आणि...
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...