साखरेचे किमान विक्री मूल्य तातडीने वाढवा : शरद पवार

सध्या साखर उद्योग संकटात असून, केंद्राने तातडीने साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) वाढवावा, अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी (ता.३) केंद्र सरकारकडे केली.
Sharad pawar and shaha
Sharad pawar and shaha

कोल्हापूर : सध्या साखर उद्योग संकटात असून, केंद्राने तातडीने साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) वाढवावा, अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी (ता.३) केंद्र सरकारकडे केली. 

खासदार पवार यांच्यासह राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन साखर उद्योगाच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. त्या वेळी ही मागणी करण्यात आली. मंत्री शहा यांनी दरवाढीबाबत पूर्ण सहमती दर्शविली. मात्र याबाबत पंतप्रधानांशी चर्चा करून लवकरच योग्य निर्णय करण्यात येईल, असे आश्‍वासित केले. 

राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आदी या वेळी उपस्थित होते. बैठकीत साखरेच्या किमान विक्री दराच्या वाढीबाबबत विस्ताराने चर्चा झाली. खासदार पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहा यांच्याकडे सध्याच्या साखर उद्योगाबाबतची स्थिती मांडली. 

राष्ट्रीय जैविक इंधन धोरणांतर्गत केंद्र सरकारकडून इथेनॉल प्रकल्पाबाबत जी सकारात्मक पावले टाकली जात आहेत त्याबाबत श्री. दांडेगावकर यांनी समाधान व्यक्त केले. मात्र बँक स्तरावर इथेनॉल प्रकल्पासाठी कर्ज मिळविण्यात ज्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत त्याची विस्ताराने माहिती मंत्री शहा यांना करून देण्यात आली. विशेषतः कारखान्यांच्या ताळेबंदामुळे बँकांकडून कर्ज मिळण्याच्या अडचणी येत आहेत याबाबत चर्चा झाली. 

या चर्चेदरम्यान श्री. पवार व श्री. दांडेगावकर यांनी मंत्री शहा यांचे लक्ष्य आयकराबाबत चाललेल्या वादाकडे वेधले. याबाबत मंत्री शहा यांनी अभ्यास करून लवकरच निर्णय घेऊ, असे सांगितले. ‘नाबार्ड’चे कडक निकष तसेच आरबीआयचे कोविड १९ चे आर्थिक पॅकेज याबाबत चर्चा झाली. या सर्व मुद्द्यांचे सविस्तर टिपण सादर करण्यात आले.  बँकांच्या लवचिक धोरणाबाबत १५ ऑगस्ट पूर्वी आदेश  मंत्री शहा यांनी सांगितले, की इथेनॉलच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला कर्जपुरवठा करण्यासाठी बँकांनी आपले धोरण लवचिक करावे, असे आदेश १५ ऑगस्टपूर्वी निर्गमित करण्यात येतील. यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी केंद्रीय अर्थ सचिव तसेच आरबीआयचे गव्हर्नर व इतर संबंधित अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे.  शहा यांना व्हीएसआय भेटीचे निमंत्रण  पुढील महिन्यात मंत्री शहा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्या वेळी त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तसेच कारखान्यांना भेट करण्याबाबत निमंत्रित करण्यात आले. श्री. शहा यांनी येण्यास अनुकूलता दाखवली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com