agriculture news in Marathi increased MSP of sugar Maharashtra | Agrowon

साखरेचे किमान विक्री मूल्य तातडीने वाढवा : शरद पवार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

सध्या साखर उद्योग संकटात असून, केंद्राने तातडीने साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) वाढवावा, अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी (ता.३) केंद्र सरकारकडे केली. 

कोल्हापूर : सध्या साखर उद्योग संकटात असून, केंद्राने तातडीने साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) वाढवावा, अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी (ता.३) केंद्र सरकारकडे केली. 

खासदार पवार यांच्यासह राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन साखर उद्योगाच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. त्या वेळी ही मागणी करण्यात आली. मंत्री शहा यांनी दरवाढीबाबत पूर्ण सहमती दर्शविली. मात्र याबाबत पंतप्रधानांशी चर्चा करून लवकरच योग्य निर्णय करण्यात येईल, असे आश्‍वासित केले. 

राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आदी या वेळी उपस्थित होते. बैठकीत साखरेच्या किमान विक्री दराच्या वाढीबाबबत विस्ताराने चर्चा झाली. खासदार पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहा यांच्याकडे सध्याच्या साखर उद्योगाबाबतची स्थिती मांडली. 

राष्ट्रीय जैविक इंधन धोरणांतर्गत केंद्र सरकारकडून इथेनॉल प्रकल्पाबाबत जी सकारात्मक पावले टाकली जात आहेत त्याबाबत श्री. दांडेगावकर यांनी समाधान व्यक्त केले. मात्र बँक स्तरावर इथेनॉल प्रकल्पासाठी कर्ज मिळविण्यात ज्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत त्याची विस्ताराने माहिती मंत्री शहा यांना करून देण्यात आली. विशेषतः कारखान्यांच्या ताळेबंदामुळे बँकांकडून कर्ज मिळण्याच्या अडचणी येत आहेत याबाबत चर्चा झाली. 

या चर्चेदरम्यान श्री. पवार व श्री. दांडेगावकर यांनी मंत्री शहा यांचे लक्ष्य आयकराबाबत चाललेल्या वादाकडे वेधले. याबाबत मंत्री शहा यांनी अभ्यास करून लवकरच निर्णय घेऊ, असे सांगितले. ‘नाबार्ड’चे कडक निकष तसेच आरबीआयचे कोविड १९ चे आर्थिक पॅकेज याबाबत चर्चा झाली. या सर्व मुद्द्यांचे सविस्तर टिपण सादर करण्यात आले. 

बँकांच्या लवचिक धोरणाबाबत १५ ऑगस्ट पूर्वी आदेश 
मंत्री शहा यांनी सांगितले, की इथेनॉलच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला कर्जपुरवठा करण्यासाठी बँकांनी आपले धोरण लवचिक करावे, असे आदेश १५ ऑगस्टपूर्वी निर्गमित करण्यात येतील. यावर तातडीने निर्णय घेण्यासाठी केंद्रीय अर्थ सचिव तसेच आरबीआयचे गव्हर्नर व इतर संबंधित अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. 

शहा यांना व्हीएसआय भेटीचे निमंत्रण 
पुढील महिन्यात मंत्री शहा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्या वेळी त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तसेच कारखान्यांना भेट करण्याबाबत निमंत्रित करण्यात आले. श्री. शहा यांनी येण्यास अनुकूलता दाखवली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 


इतर बातम्या
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी...परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत....
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : ...गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना...
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
पुणे जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी हलक्या...पुणे : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण...
एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे...पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये...कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून,...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनीचोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी...
पूर्व विदर्भात पावसामुळे हाहाकार नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा आणि नागपूर...
पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची :...सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक...