कमी पाऊस झाल्याने मनरेगा’च्या मजुर संख्येत वाढ

कमी पाऊस झाल्याने मजुरांच्या संख्येत वाढ
कमी पाऊस झाल्याने मजुरांच्या संख्येत वाढ

नगर : पावसाने हात आखडता घेतल्याने खरीप हंगाम वाया गेला. रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट कायम आहे. दुष्काळाची तीव्रता गंभीर वळण घेत आहे. या परिस्थितीत जिल्हा प्रशासनाद्वारे रोजगार हमीची कामे सुरू आहेत. पर्जन्यमानामुळे शेतीचे गणित विस्कटले आहे. शेतमजुरांना ‘मनरेगा’च्या कामाला जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जिल्हाभरात ग्रामपंचायती आणि विविध यंत्रणांची मिळून ३४ हजार ९८२ कामे आहेत. त्यांची मजूरक्षमता २४ लाख पाच हजार आहे. सध्या यापैकी ग्रामपंचायत आणि इतर यंत्रणा मिळून एक हजार ९०२ कामे सुरू असून, सहा हजार ९३३ जणांना रोजगार हमी शाखेतर्फे रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. आगामी काळात टंचाईमुळे मजुरांची आकडेवारी व कामांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. टॅंकरची संख्याही वाढत दोनवरून ५४ वर गेली आहे.

तालुकानिहाय कामे (कंसात मजुरांची उपस्थिती) अकोले- १२९ (३५६), जामखेड- १७४ (६६७), कर्जत- २४३ (८३१), कोपरगाव- १४५ (२७८), नगर- १४५ (२७८), नेवासे- ७८ (३२१), पारनेर- १०१ (५५८), पाथर्डी- १६० (६०४), राहाता- ११९ (३४३), राहुरी- ८५ (२८०), संगमनेर- १८३ (५९६), शेवगाव- १३१ (६६९), श्रीगोंदे- ११३ (५१५), श्रीरामपूर- १०२ (४७४).

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत जेवढी मागणी होईल, तेवढ्या प्रमाणात मजुरांना काम दिले जाईल. पालकमंत्री राम शिंदे या संदर्भात आढावा घेणार आहेत. अपवादात्मक स्थिती निर्माण झाली, तर आम्ही त्याचा सामना करण्यास समर्थ आहोत. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com