पाणलोटातील पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ 

पाणलोटातील पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ 
पाणलोटातील पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ 

पुणे : जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या घाटमाथा व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. झरे, ओहोळ, नाले, नद्यांमधून धरणांना पाण्याचा पुरवठा होत असल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. खडकवासला, चासकमान, वीरसह कळमोडी, आंद्रा, वडीवळे, वडज धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुठा, इंद्रायणी, नीरा, भीमा नद्यांना पूर आला आहे. 

गेले काही दिवस जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या तालुक्यांमध्ये आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडला. या पावसाने तळाशी गेलेली धरणे झपाट्याने भरल्याने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला. उपनद्यांमधून वाहणाऱ्या पाण्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. हे सर्व पाणी जमा होत असल्याने अचल पातळीत गेलेल्या उजनीचा पाणीसाठा लवकरच उपयुक्त पातळीत येणार आहे. सोमवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उजनी धरणात तब्बल ७.१२ टीएमसी नवीन पाणी आले आहे. 

सोमवारी सकाळी कालवा, नदीपात्रात, जलवाहिनी आणि पॉवर हाउससह विविध मार्गाने धरणातून पाणी सोडण्यात येत होते. यात खडकवासला धरणातून एकूण ४८१४ क्युसेक, कळमोडी धरणातून २ हजार ६६४ क्युसेक, चासकमान धरणातून १३ हजार १५५, आंद्रातून ५ हजार ७२, वडीवळे २ हजार ४५४, वीर धरणातून २ हजार ४००; तर वडज धरणातून १ हजार ५७१ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. दौंड येथे भीमा नदीपात्रात तब्बल ५५ हजार ८६० हजार क्युसेक वेगाने पाणी उजनीत जमा होत आहे. 

जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : टेमघर ६९, वरसगाव ४१, पानशेत ४१, खडकवासला ६, पवना ६४, कासारसाई २१, मुळशी ५९, कळमोडी ५१, चासकमान २६, भामा आसखेड १६, आंद्रा ६८, वडीवळे १०१, गुंजवणी २९, भाटघर १७, नीरा देवघर ६७, वीर २, पिंपळगाव जोगा ९३, माणिकडोह ७५, येडगाव २५, वडज १०, डिंभे १७.

जिल्ह्यात मंडळनिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) :  घोटावडे ८८, माले ५९, मुठा ६९, भोलावडे १४०, वडगाव मावळ ४८, काळे कॉलनी ६४, कार्ला १८७, खडकाळा ११६, लोणावळा १२७, शिवणे ६५, वेल्हा ६६, पानशेत ४१, राजूर १२७, डिंगोरे १३६, आपटाळे ५१, वाडा ५९, कुडे ६०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com