अकोला जिल्ह्यात ‘लंम्पी’चा प्रादुर्भाव वाढता

जिल्ह्यातील काही गावांमध्ये लंम्पी आजाराची लक्षणे जनावरात आढळून येत आहे. सध्या याचे प्रमाण कमी असले तरी सातत्याने यात वाढ होत असल्याने वेळीच उपाययोजना सुरू करण्याची मागणी पशुपालकांमधून केली जात आहे.
Increasing incidence of 'Lampi' in Akola district
Increasing incidence of 'Lampi' in Akola district

अकोला ः जिल्ह्यातील काही गावांमध्ये लंम्पी आजाराची लक्षणे जनावरात आढळून येत आहे. सध्या याचे प्रमाण कमी असले तरी सातत्याने यात वाढ होत असल्याने वेळीच उपाययोजना सुरू करण्याची मागणी पशुपालकांमधून केली जात आहे.

लंम्पी विषाणूजन्य रोग असून देवी या विषाणू गटातील आहे. हा रोग गाई व म्हशीमध्ये आढळून येत आहे. लहान वासरात याची तीव्रता अधिक असल्याचेही समोर आले. जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी वाहणे, ताप येणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. शिवाय लागण झालेल्या जनावरांच्या अंगावर १ ते ५ सेंटिमीटर आकाराच्या गाठी येत वाढत आहेत. कातडीसुद्धा खराब होत आहे.

जनावरांमध्ये हा आजार वेगाने फैलावत असून जिल्ह्यात अद्याप उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत. याबाबत माहिती मिळवली असता रोगाच्या लागणीबाबत प्रशासकीय स्तरावर अद्याप घोषणा झालेली नाही. अधिकाऱ्यांकडून लसीची मागणी नोंदविण्यात आलेली असल्याचे सांगण्यात आले. या विषाणूचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. त्यानंतर पुढील उपाययोजनांना वेग दिल्या जाईल. सध्या या रोगाची लागण झालेल्या व तपासणीसाठी पशुचिकित्सालयात येणाऱ्या जनावरांवर औषधोपचार केले जात आहेत. साथीचा प्रसार वेगाने नसला तरी वाढ होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते.

खबरदारी घेण्याचा सल्ला पशुवैद्यकांकडून या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुपालकांना काही सल्ले दिले जात आहेत. यात प्रामुख्याने या आजाराचे जनावर लंगडणे, अंगाची कातडी खराब, कातडीवर गाठी दिसणे ही लक्षणे आहेत. रोगाचा प्रसार गोचीड, गोमाशी, डास व चिलटे यांच्यामार्फत होतो. बाधित जनावरांच्या स्पर्शाने देखील या रोगाचा संसर्ग होऊ शकतो. दूध पिणाऱ्या वासरांना गाईच्या दुधातून या रोगाचा प्रसार होऊ शकतो. या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी आजारी जनावरास वेगळे बांधावे. तसेच गोठ्यात कीटकनाशक औषधांची फवारणी करावी. गोठ्यातील साहित्याचे निर्जंतुकीकरण करावे. पशुपालकाने जनावरांच्या संपर्कात आल्यास हात व कपडे स्वच्छ धुऊन घ्यावे. पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करून आजारी जनावरांवर उपचार करून घ्यावेत. रोगग्रस्त भागातून जनावरांची खरेदी व वाहतूक करू नये. सदरील रोग हा विषाणूजन्य असून योग्य उपचाराने हा रोग एकदम बरा होतो. त्यामुळे पालकांनी घाबरून जायचे कारण नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com