Agriculture news in Marathi Increasing numbers of 'Corona' in Buldana district endangered | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात ‘कोरोना’ची वाढती संख्या धोकादायक

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 एप्रिल 2020

बुलडाणा ः जिल्ह्यात ‘कोरोना’बाधितांची संख्या नऊवर जाऊन पोचली असल्याने खळबळ उडाली आहे. विदर्भात बुलडाण्यात सर्वाधित बाधित रुग्ण आढळल्याने आता रुग्ण असलेल्या तालुक्यांच्या सीमा बंद केल्या जात असून संचारबंदी कडक करण्यात आली आहे. 

बुलडाणा ः जिल्ह्यात ‘कोरोना’बाधितांची संख्या नऊवर जाऊन पोचली असल्याने खळबळ उडाली आहे. विदर्भात बुलडाण्यात सर्वाधित बाधित रुग्ण आढळल्याने आता रुग्ण असलेल्या तालुक्यांच्या सीमा बंद केल्या जात असून संचारबंदी कडक करण्यात आली आहे. 

बुलडाणा जिल्हा ‘कोरोना’ संसर्गाच्या बाबतीत हिटलिस्टवर आलेला आहे. २९ मार्चला बुलडाण्यात एका ‘कोरोना’ बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील तीन जणांना ‘कोरोना’ची बाधा झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे बुलडाण्याची संख्या ही चारवर पोहोचली होती. मात्र, आता दिल्लीच्या निजामुद्दीन येथून आलेल्या नागरिकांची तपासणी झाल्यानंतर त्यांच्यापैकी तब्बल चार रुग्ण ‘कोरोना’ बाधित असल्याचे रविवारी (ता. ५) स्पष्ट झाले आहे. सध्या जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या नऊ वर पोचली आहे. 

जिल्हा प्रशासनाने याची गांभिर्याने दखल घेत सर्वेक्षण मोहीम उघडली. ज्या-ज्या भागात ‘कोरोना’चा रुग्ण आढळला तो परिसर सील केल्या जात आहेत. त्या ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकासह तो ज्यांच्या संपर्कात आला त्यांची तपासणी करून अहवाल तपासणीसाठी पाठविले जात आहेत. 

सीमा सील 
बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, खामगाव या तालुक्यांमध्ये ‘कोरोना’चे रुग्ण आढळून आल्याने या चारही तालुक्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. या तालुक्यातील ये-जा पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. संचारबंदी कलमाची पायबंदी करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई केली जात आहे. 

शेतकऱ्यांना मोठा फटका 
‘कोराना’ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात असून तालुक्यांच्या सीमा बंद केल्याने शेतमाल उत्पादकांना फटका बसला आहे. प्रामुख्याने भाजीपाला उत्पादक व फळ बागायतदारांची कोंडी झाली आहे. भाजीपाला विक्रीत मोठी घट आली आहे. मागणी असूनही बाजारपेठेपर्यंत भाजीपाला जात नसल्याने जागेवरच नुकसान झेलावे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.  
 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...