Agriculture news in marathi Independent inquiry into Vitthal's stewardship: Raju Shetty | Agrowon

‘विठ्ठल’च्या कारभाराची स्वतंत्र चौकशी करा : राजू शेट्टी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 जानेवारी 2020

पंढरपूर, जि. सोलापूर : विठ्ठल साखर कारखान्याच्या आर्थिक डबघाईस कारखान्याचे अध्यक्ष आणि त्यांचे संचालक मंडळ जबाबदार आहेत. या लोकांनी कारखान्याचा वापर सभासदांच्या हितासाठी न करता केवळ स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक हितासाठी केला आहे. कारखान्याच्या कारभाराची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघनटेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी (ता.२४) केली. लवकरच पंढरपुरात येथील कारखान्याच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी साखर परिषद घेतली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

पंढरपूर, जि. सोलापूर : विठ्ठल साखर कारखान्याच्या आर्थिक डबघाईस कारखान्याचे अध्यक्ष आणि त्यांचे संचालक मंडळ जबाबदार आहेत. या लोकांनी कारखान्याचा वापर सभासदांच्या हितासाठी न करता केवळ स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक हितासाठी केला आहे. कारखान्याच्या कारभाराची स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघनटेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी (ता.२४) केली. लवकरच पंढरपुरात येथील कारखान्याच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी साखर परिषद घेतली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी विठ्ठल मंदिरा समोरील नामदेव पायरी जवळ सरकारच्या कर्जमाफी धोरणाच्या विरोधात आंदोलन झाले. त्यापूर्वी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी गुरसाळे येथील बंद पडलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी अशी मागणी केली. 

शेट्टी म्हणाले, ‘‘सहकारी साखर कारखानदारी टिकली पाहिजे, यासाठी आमचा लढ सुरु आहे. अनेक लोकांनी सहकाराचा स्वहाकार केला आहे. या लोकांनी कोटवधी रुपयांची माया जमा केली आहे. साखर कामगारांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. करमाळ्यात एका कामगाराने आत्मह्त्या केली. हे सहकाराचे अपयश असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

मुख्यमंत्र्यांना भेटणार 

पंढरपूर भागातील अनेक साखर कारखाने यावर्षी बंद पडले आहेत. त्यास कारखान्याचे व्यवस्थापनच जबाबदार आहे. अशा लोकांच्या कारभाराचा पंचनाम केला जाईल. यासाठी पंढरपुरात स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर परिषद घेतली जाईल.यामध्ये तज्ज्ञांना बोलावून शेतकर्यांना मार्गदर्शनही केले जाणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील नावजलेला विठ्ठल साखर कारखान्याची अवस्था पाहावत नाही. त्यामुळे आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून यासंदर्भात चौकशीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  
 


इतर ताज्या घडामोडी
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...