काजू, आंब्यासाठी स्वतंत्र कीड-रोग सर्वेक्षक

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन (हार्टसप) प्रकल्पात यंदा काजूचाही समावेश केला आहे. काजूवर कीड, रोगांवर प्रादुर्भाव झाल्यास त्यावरील उपाययोजना तत्काळ शेतकऱ्यापर्यंत पोचवण्यात येणार आहेत. कृषी विभागामार्फत २०१५-१६ पासून आंबा पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हार्टसप) राबविण्यात येत आहे.
Independent Pest-Disease Surveyor for Cashew, Mango
Independent Pest-Disease Surveyor for Cashew, Mango

रत्नागिरी : कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन (हार्टसप) प्रकल्पात यंदा काजूचाही समावेश केला आहे. काजूवर कीड, रोगांवर प्रादुर्भाव झाल्यास त्यावरील उपाययोजना तत्काळ शेतकऱ्यापर्यंत पोचवण्यात येणार आहेत. कृषी विभागामार्फत २०१५-१६ पासून आंबा पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हार्टसप) राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पांतर्गत किडी व रोगांचे सर्वेक्षण करण्यात येते. त्यासाठी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये स्वतंत्र कीड सर्वेक्षकांची नेमणूक केली असून, कृषी पर्यवेक्षक सर्वेक्षण करतात. यामध्ये २ हजार हेक्टर क्षेत्राला एक कीड सर्वेक्षकांची नियुक्ती केली होती. काजूसाठी ४३ कीड सर्वेक्षक आणि आंब्यासाठी ३५ कीड सर्वेक्षकांची नियुक्ती केली आहे. काजू, आंब्यासाठी प्रत्येकी ९ कृषी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आठवड्यात एका कीड सर्वेक्षकांमार्फत ३२ ठिकाणांना भेट देऊन तेथील बागांमध्ये कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे, याची पाहणी केली जाते. प्रत्येक तालुक्याला एक शेतीशाळा यामध्ये घेतली जाणार आहे. त्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल.

यंदा हार्टसप या प्रकल्पासाठी ५ लाख ८९ हजार ४१६ रुपयांची मान्यता मिळाली असून, त्यातील २ लाख ७३ हजार २०८ रुपये प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत शेतीशाळांसह विविध गोष्टींवर १ लाख ३ हजार रुपये खर्ची पडले आहेत. रोजगार हमी योजनेंतर्गत काजूची मोठया प्रमाणावर लागवड झाली असून, दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहेत. बदलत्या वातावरणामुळे अलीकडे आंब्याबरोबर काजूवरील कीड, रोगाच्या समस्या गंभीर होत आहेत. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे निसर्गाचा समतोल बिघडला असून, किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोकणात उष्ण व दमट हवामान रोग आणि किडीसाठी पोषक बनले आहे. त्यासाठी पीक संरक्षणाचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. या परिस्थितीत पीक संरक्षणास एक वेगळी दिशा देण्यासाठी कीटकनाशकांचा शक्यतो कमीत कमी वापर करून एकात्मिक कीड व्यवस्थापनांचा मार्ग अवलंबणे गरजेचे आहे.

वेळीच उपाययोजना शक्य होणार आंबा, काजू पिकांचे सर्वेक्षण करून हंगामनिहाय कीडरोगांच्या प्रादुर्भावाबाबत शेतकऱ्यांना वेळीच उपाययोजना सुचविणे, कीड रोगांच्या आकस्मिक प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे, कीड रोगांच्या प्रादुर्भाव वेळीच लक्षात आल्याने पुढील संभाव्य नुकसान टाळून उत्पादनात वाढ करणे, कीडरोगांबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून कीडरोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे, कीड रोगांच्या प्रादुर्भावित क्षेत्रासाठी आपत्कालीन परिस्थितीत पीक संरक्षण औषधे उपलब्ध करून देणे, कायम स्वरूपाच्या व्यवस्थापनाबाबत कृषी विद्यापीठांच्या साहाय्याने शिफारशी निश्चित करणे आदी उद्देश हार्टसॅप योजनेतून साध्य होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com