agriculture news in Marathi, India back in cotton productivity, Maharashtra | Agrowon

कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाट
चंद्रकांत जाधव
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

कापसाची उत्पादकता देशात ४८० किलो रुई प्रतिहेक्‍टरीपुढे नसणार, असे चित्र आहे. अनेक वर्षांत उत्पादन ३१० लाख गाठींवर येणार आहे. ही बाब देशांतर्गत कापूस प्रक्रिया उद्योग, शेतकऱ्यांसाठीदेखील चिंताजनक आहे. गुजरातमधील भावनगर, सुरेंद्रनगर, राजकोट या सौराष्ट्रमधील भागालादेखील मोठा फटका दुष्काळाने बसला आहे. 
- अनिल सोमाणी, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

जळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारताची या हंगामातील कापूस उत्पादकता ४८० किलो रुई प्रतिहेक्‍टरीपर्यंत राहील, असा अंदाज आहे. याच वेळी चीन, मेक्‍सिको, ब्राझील, ऑस्ट्रेलिया या देशांनी आपली कापूस उत्पादकता टिकवून ठेवल्याचेही जाणकारांचे म्हणणे आहे. 

कापूस उत्पादनात भारत या हंगामात जगात दुसऱ्या क्रमांकावर फेकला जाण्याची शक्‍यतादेखील आहे. देशात या हंगामात १२० लाख हेक्‍टरवर लागवड झाली होती. उत्पादन सुमारे ३१० ते ३२० लाख गाठींपर्यंत (एक गाठ १७० किलो रुई) हाती येईल, अशी स्थिती आहे. उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत (२०१७-१८) सुमारे ४० ते ५० लाख गाठींनी कमी होईल, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे. 

देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये असलेल्या महाराष्ट्रात सुमारे १० लाख गाठी, गुजरातेत ३० लाख गाठी व तेलंगणा, कर्नाटक व इतरत्र मिळून सुमारे १० ते १२ लाख गाठींनी उत्पादन कमी झाले आहे. सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस आला नाही. परिणामी उत्पादन व उत्पादकता घसरली आहे. मागील हंगामात उत्पादन ३६२ लाख गाठींपर्यंत होते. उत्पादनात मागील हंगामात भारत क्रमांक एक होता, या हंगामात उत्पादनात भारत चीनच्या मागे म्हणजेच क्रमांक दोनवर आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

भारताची कापूस उत्पादकता मागील हंगामाच्या तुलनेत ३५ ते ४० किलो रुई प्रतिहेक्‍टरी, एवढी घटणार असल्याचेही संकेत आहेत. चीनमध्ये या हंगामात सुमारे ३४० लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. तेथे ३२ हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती. तेथे सरळ व गुणवत्तापूर्ण वाण आणि सिंचनासंबंधी बऱ्यापैकी सुविधा असल्याने उत्पादकता, उत्पादन चांगले आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. भारतासारखीच कमी उत्पादकता आफ्रिकेतील अंगोला, इथिओपिया, घाना केनिया, टांझानिया, झांबिया, झिंम्बावे, युगांडा या देशांचीदेखील आहे.

फक्त साऊथ आफ्रिकेची उत्पादकता एक हजार किलो रुई प्रतिहेक्‍टरी आहे. तर साऊथ आफ्रिकासह या देशांची उत्पादकता मिळून २१७ किलो रुई प्रतिहेक्‍टरी राहिली आहे. या देशांमध्ये २४ हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती. आफ्रिका खंडातील देश आणि भारत यांचा अंतर्भाव करून जगाची कापूस उत्पादकता या हंगामात ७०० किलो रुई प्रतिहेक्‍टरीपर्यंत पोचणार असल्याची स्थिती आहे. देशाची कापूस उत्पादकता ७७० किलो रुई प्रतिहेक्‍टरी, अशी राहण्याचा अंदाज कापूस हंगामाच्या सुरवातीला म्हणजेच सप्टेंबर, २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने व्यक्त केला होता.

कापूस उत्पादकतेत जगात तुर्की, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन, मेक्‍सिको या देशांचा डंका कायम राहिला असून, मागील दोन दशकांपासून या भागांत कापूस उत्पादकता फारशी कमी झालेली नाही. ऑस्ट्रेलियाची उत्पादकता जगात सर्वाधिक आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर, कमी कालावधीत येणारे कापूस वाण, कापूस वाण विकसित करण्यासंबंधीचे ठोस धोरण (सरकारचे प्रोत्साहन) आदी या देशांमधील कापूस उत्पादकता टिकवून ठेवण्याचे गमक असल्याचेदेखील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियात फक्त चार हजार हेक्‍टर, तुर्कीमध्ये साडेपाच हजार हेक्‍टर, तुर्कीमध्ये साडेचार हजार हेक्‍टरपर्यंत कापसाची लागवड झाली होती. मेक्‍सिकोमध्ये दोन हजार हेक्‍टर, ब्राझीलमध्ये १२ हजार हेक्‍टरवर कापूस लागवड झाली होती, अशी माहिती मिळाली. बांगलादेशात सुमारे ४५० हेक्‍टरवर कापूस लागवड झाली होती. त्यांची उत्पादकता ७६५ किलो रुई प्रतिहेक्‍टरीपर्यंत राहिली आहे. 

प्रतिक्रिया
ब्राझील, चीन व ऑस्ट्रेलियामध्ये कापूस उत्पादकांना गरजेएवढे पाणी, गुणवत्तापूर्ण वाण, हवी तशी लांबी व ताकदीची रुई निर्माण करणारी यंत्रणा, वाण तेथील सरकारने दिले आहेत. भारतात, असे मागील अनेक वर्षांत झालेले नाही. पावसातील अनियमितता आणि सिंचनाच्या सुविधांसह गुणवत्तापूर्ण वाणांचा अभाव यामुळे भारत उत्पादकता, उत्पादनात मागे पडला आहे. यंदा तर चिंताजनक स्थिती आहे. एका कापूस उत्पादकाला २० ते २५ क्विंटल कापूस पिकला तर तो सरकारकडे अनुदान व इतर भरपाई कशाला मागेल हो?
- दिनेश हेगडे, कापूस निर्यातदार, मुंबई

 

इतर अॅग्रो विशेष
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
नीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...
मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...
खरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...
चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...
उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...
राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...
देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...