आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
अॅग्रो विशेष
सीड हब म्हणून भारताचा उदय
अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक आणि देशातील बियाणे कंपन्यांची चांगली कामगिरी यामुळे भारत चांगल्या गुणवत्तेच्या बियाणे उत्पादन आणि पुरवठ्यासाठी एक पॉवरहाऊस बनले आहे.
- इडो व्हेर्हागेन, संचालक, ॲक्सेस टू सीड इंडेक्स
नवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून उदयास आला आहे. जगातील बिजोत्पादनातील मोठ्या आणि महत्त्वाच्या २४ कंपन्यांपैकी १८ कंपन्या भारतात पैदास आणि उत्पादन करतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बिजोत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणात भारतात गुंतवणूक करीत असून, त्याचा लाभ अल्प भूधारक शेतकऱ्यांना होत आहे, असे वर्ल्ड बेंचमार्कींग अलायंसने (डब्ल्यूबीए) प्रकाशित केलेल्या ॲक्सेस टू सीड इंडेक्समध्ये (एएसआय) म्हटले आहे.
भारतात जमिनीचे तुकडीकरण मोठ्या प्रमाणात झाले असून, त्याचा परिणाम भू-धारणेवर झाला आहे. देशात सध्या जवळपास १० कोटी अल्पभूधारक शेतकरी आहेत. हे शेतकरी देशातील ८० टक्के अन्नधान्याचा पुरवठा करतात. या शेतकऱ्यांना अधिकाअधिक उत्पादनासाठी बियाणे कंपन्या बिजोत्पादनासाठी गुंतवणूक करून मदत करत असतात. ‘‘आशिया खंडातील महत्त्वाच्या आणि मोठ्या २४ बियाणे कंपन्यांचे मूल्यांकन केल्यानंतर असे निदर्शनास आले, की यापैकी २१ कंपन्या भारतात बियाणे विक्री करतात आणि १८ कंपन्या बिजोत्पादनासाठी गुंतवणूक करतात,’’ असेही ‘एएसआय’मध्ये म्हटले आहे.
भारतानंतर आशियातील थायलंड देशात ११, तर इंडोनेशियात आठ कंपन्या बिजोत्पादन करतात. तसेच निर्देशांकानुसार दक्षिण आशियातील मोठ्या १० कंपन्यांमध्ये पहिल्यांदा भारताच्या अदवेंता, अक्सेन हायवेज, नामधारी आणि नुजिविडू या चार कंपन्यांचा समावेश झाला आहे.
बौद्धिक संपदा अधिकाराबाबत (आयपी) इंडेक्समध्ये म्हटले आहे, की इस्ट-वेस्ट सीड आणि सिजेंटा या कंपन्या ‘आयपी’संदर्भात तोलामोलाच्या आणि छान काम करणाऱ्या आहेत. तरीही या कंपन्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या गरजा विचारात घ्याव्या लागतील आणि त्यांच्या कामगिरीबाबत पारदर्शक असावे लागेल. मोन्सॅन्टो ही ‘आयपी’बाबत अधिक पारदर्शक अशी कंपनी आहे. परंतु, या कंपनीची भूमिका ही अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रतिकूल अशी आहे, असे ‘एएसआय’मध्ये म्हटले आहे.
देशातील नामधारी सीड्स आणि नुजिवीडू सीड्स या कंपन्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पैदास कार्यक्रम राबविल्यामुळे इंडेक्समध्ये जास्त गुणांक देण्यात आला आहे. सध्या भारातील ८३ टक्के कंपन्या या सर्व्हिस एक्सटेंशनचे काम करीत आहेत.
- 1 of 673
- ››