agriculture news in Marathi India dependent on china for raw material of fertilizer Maharashtra | Agrowon

कृषी उद्योगांसाठी अजूनही चीन हाच तारणहार 

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

जागतिक पातळीवर चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न झाल्यास भारतीय कृषी उद्योगातील काही उत्पादकांना कच्च्या मालासाठी मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल. चीनसारखे प्रकल्प तातडीने उभारणे सोपे नाही. किमान दोन-तीन वर्षे असे प्रकल्प पूर्ण होण्यास लागतील. अर्थात, तोपर्यंत स्वस्त आणि भरपूर कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी चीनशिवाय अन्य पर्याय नाही.
- प्रदीप कोठावदे, कृषी उद्योजक 

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत' ही घोषणा केली असली तरी कृषी क्षेत्राचे विविध देशांवर असलेले अवलंबित्व कमी होणे कठीण असल्याचे चित्र आहे. देशातील सूक्ष्म अन्नद्रव्ये, विद्राव्य खते, तसेच कीडनाशके उत्पादकांना कच्च्या मालासाठी यापुढेही चीन हाच एकमेव आधार राहील, असे या उद्योगातील जाणकारांचे म्हणणे आहे. 

या उद्योगांसाठी मार्चपर्यंत कच्च्या मालाचा सर्वात मोठा पुरवठादार देश चीन हाच होता. कोरोनाची साथ पसरल्यानंतर चीनमधून आयात बंद झाली. आता चिनी उत्पादनाला पर्याय म्हणून देशात उद्योग उभारण्याची चर्चा सुरू आहेत. तथापि, उद्योजकांना हे अशक्यप्राय वाटते आहे. 

भारतीय सूक्ष्म अन्नद्रव्य उद्योगाला विविध प्रकारची चिलेटस् तयार करण्यासाठी इडीटीए (इथिलीन डायअॅमिन ट्रेटाअॅसीटिक आम्ल) लागतात. इडीटीएचा सर्वांत मोठा उत्पादक देश चीन आहे. भारतात सध्या इडीटीएचा एकही प्रकल्प नाही. तसा देशी प्रकल्प उभारला जाण्याची शक्यताही नाही. कारण, इडीटीए प्रकल्प भयावह प्रदूषण निर्माण करतात. त्यामुळे भारतात केवळ सध्या इडीटीए सॉल्ट तयार केले जातात. 

चिनी ईटीडीएपासून झिंक, आयर्नचे विविध उत्पादने भारतीय कंपन्या तयार करतात. त्याचा पुरवठा देशातील शेतकऱ्यांना केला जातो. मुख्यत्वे फळबागांसाठी इडीटीएचा वापर होत असून महाराष्ट्र हीच देशातील प्रमुख बाजारपेठ आहे. महाराष्ट्रात तीन हजार टन इटीडीए वापरला जात असावा, असा अंदाज आहे. गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक,राजस्थान भागातील फळबागायतदार शेतकरी देखील इडीटीए वापरतात. जास्त पीएच असलेल्या जमिनीत हाच घटक वापरावा लागतो. 
 

 


इतर अॅग्रो विशेष
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
मॉन्सून आज केरळात येण्याचे संकेतपुणे  : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांलगत...
कोकणात मुसळधार पावसाचा इशारापुणे  : अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे...
आठवडाभरापासून टोळधाड विदर्भातचनागपूर   ः गेल्या आठवडाभरापासून...
परभणीतील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीत...परभणी  ः राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
चाकणच्या जनावरे बाजारात एक कोटींची...पुणे  ः गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून ‘...
भाजीपाला लागवडीतून उघडला प्रगतीचा मार्गसोयाबीन, भात अशा पारंपरिक कोरडवाहू पिकांवर भिस्त...
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका...नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या...
विदर्भात टोळधाडीची अस्तित्व कायमनागपूर : कृषी विभागाकडून टोळधाड नियंत्रणासाठी...
राज्यातील भाजीपाला लागवड खोळंबली कोल्हापूर: सध्याच्या स्थितीत भाजीपाल्याचे...
राज्यात देशी कोंबडी पिलांना मागणी वाढली नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत...
शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू...बुलडाणा ः या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त...
राज्यात बेदाण्याचे सव्वा दोन लाख टन...सांगली : यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ‘कोरोना...
मॉन्सूनची आणखी प्रगती शक्यपुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल...
राज्यात ५८२० पाणी वापर सोसायट्या स्थापन...पुणे  : राज्यातील विविध धरणांच्या क्षेत्रात...
राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीचा राजस्थानमधील ९० हजार हेक्टरला...जयपूर, राजस्थान  ः राज्यातील २० जिल्ह्यांतील...