पाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्क

पाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्क
पाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्क

नवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला दिलेला "मोस्ट फेव्हर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतल्यानंतर भारताने शनिवारी या देशाला दुसरा आर्थिक दणका दिला. पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या सर्व उत्पादनांवर आता २०० टक्के शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्‌विटरद्वारे दिली. भारत पाकिस्तानकडून प्रामुख्याने फळे, सिमेंट यांसह पेट्रोलियम उत्पादने, खनिजे, विविध रसायने व इतर मालाची आयात करतो. फळांच्या आयातीवर आतापर्यंत ३० ते ५० टक्के, तर सिमेंट आयातीवर ७.५ टक्के शुल्क आकारले जात होते. मात्र, आता सर्व प्रकारच्या आयात उत्पादनांवर २०० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. यामुळे या उत्पादनांच्या किमतीत भरमसाट वाढ होणार असून, याचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे. दरम्यान, २०१७-१८ मध्ये पाकिस्तानकडून झालेली आयात ४८.८५ कोटी डॉलर (सुमारे ३,४८२.३ कोटी रुपये) होती. आम्हाला तुमचे काही नको! पाकिस्तानकडून आयात होणाऱ्या मालावर तत्काळ प्रभावाने लागू केलेली २०० टक्के शुल्कआकारणी म्हणजे भारताने या आयातीवर एकप्रकारे घातलेली बंदीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, भारत लवकरच पाककडून विशिष्ट वस्तूंची आयात मर्यादित करून बंदरांशी संबंधित निर्बंध घालू शकतो, असे सूत्रांनी म्हटले आहे. व्यापाराची सद्यःस्थिती :  (एप्रिल ते ऑक्‍टोबर) भारताची पाकला निर्यात : १.१८ अब्ज डॉलर भारताची पाककडून आयात : ३३८.६६ कोटी डॉलर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com