दिल्लीत उद्यापासून सहकारी व्यापार मेळा ः कृषिमंत्री तोमर

दिल्लीत उद्यापासून सहकारी व्यापार मेळा ः कृषिमंत्री तोमर
दिल्लीत उद्यापासून सहकारी व्यापार मेळा ः कृषिमंत्री तोमर

नवी दिल्ली ः भारत आंतरराष्ट्रीय सहकारी व्यापार मेळ्याचे उद्या (ता. ११) पासून येथील प्रगती मैदानावर प्रथमच आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली.  

कृषिमंत्री तोमर म्हणाले, की कृषी, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून या व्यापार मेळ्याचे ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यामध्ये ३५ हून अधिक देश आणि अनेक सहकारी संस्था सहभागी होणार आहेत.

या प्रदर्शनाचे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने बँकॉक येथील अांतरराष्ट्रीय संघटना NEDAC आणि भारतातील आघाडीच्या संस्था नाफेड, एपेडा, इटपो यांच्याकडून आयोजन केले आहे. यामध्ये सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ही भागीदार असणार आहे. तसेच आपला शेजारी बांगलादेशही याचा भागीदार देश आहे.

तोमर पुढे म्हणाले, की या संयुक्त उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मेळ्यामध्ये एका चर्चासत्राचे ही आयोजन केले आहे. ज्यामध्ये विविध देशांचे प्रतिनिधी आपले अनुभव तसेच मते मांडतील.

कृषी मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, की या मेळ्यास देशांतर्गत व परदेशातूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मेळ्यात १५० पेक्षा अधिक सहकारी संस्था, २० केंद्रीय संस्था, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तसेच ३५ देश सहभागी होण्याचे नक्की झाले आहे. या मेळ्यातून जागतिक स्तरावर व्यापारासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर व्यवसाय विस्तारात वैविध्यता, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि सहकारी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळण्यासाठी मदत होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com