जागतिक साखर उत्पादनात ४७.६ लाख टन घट

जागतिक साखर उत्पादनात ४७.६ लाख टन घट
जागतिक साखर उत्पादनात ४७.६ लाख टन घट

नवी दिल्ली ः जागतिक साखर उत्पादनात यंदा ४७.६ लाख टन घट होण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय साखर संघटनेने केला आहे.  २०१९-२० मध्ये (साखर वर्ष : ऑक्टोबर ते सप्टेंबर) दरम्यान भारतात कमी साखर उत्पादनामुळे ही तूट निर्माण झाल्याचे संघटनेने म्हटले आहे. तर जूनच्या अंदाजानुसार तीस लाख टन तूट दिसून आली आहे. 

मुख्यतः भारत आणि थायलंड देशातील साखर उत्पादनात घट झाल्यामुळे यंदा जागतिक उत्पादनाचा निर्धारीत लक्षांक ४.१४ दशलक्ष टनाने कमी होऊन एकूण उत्पादन १७१.९८ टन होणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

सर्वाधिक साखर उत्पादक देश असलेल्या भारतातील उत्पादन ४.७ दशलक्ष टनांनी कमी झाले आहे. तर चौथा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या थायलंडमध्ये १.५४ दशलक्ष टनांनी घट झाली आहे. साखर सेवनाचे प्रमाण वाढत चालले असतानाही जागतिक लोकसंख्येच्या दृष्टिने वापर कमी झाला आहे. साखरेचा दरडोई होणारा वापर कमी होताना दिसत आहे. यावर ‘साखर आणि आरोग्य’ यावर सुरू असलेली चर्चा तसेच साखरेपासून बनणाऱ्या उत्पादनांवर अतिरिक्त कर लावण्याचा परिणाम झाला आहे. 

जागतिक निर्यात २०१९-२० मध्ये १.६३ दशलक्ष टनांनी वाढून ५९.६४ दशलक्ष टन झाली आणि आयातीची मागणीदेखील १.६४ दशलक्ष टनांनी वाढून ५९.६६ टन होईल, अशी अपेक्षा आहे. अहवालानुसार निर्यात करणाऱ्या देशांकडून मोठ्या प्रमाणात साठा जाहीर केल्यामुळे निर्यातीसाठी अधिक साखर उपलब्ध आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com