नव्या वर्षातील पहिली अवकाश मोहीम यशस्वी; लष्करी उपग्रहासह दोन उपग्रहांचे प्रक्षेपण

नव्या वर्षातील पहिली अवकाश मोहीम यशस्वी; लष्करी उपग्रहासह दोन उपग्रहांचे प्रक्षेपण
नव्या वर्षातील पहिली अवकाश मोहीम यशस्वी; लष्करी उपग्रहासह दोन उपग्रहांचे प्रक्षेपण

श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संस्थेने (इस्रो) गुरुवारी रात्री "मायक्रोसॅट आर' आणि "कलामसॅट' या दोन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. या वर्षातील "इस्त्रो'ची पहिलीच मोहीम यशस्वी ठरली आहे. "मायक्रोसॅट आर' हा ७४० किलोग्रॅम वजनाचा लष्करी उपग्रह आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरून रात्री ११.३७ मिनिटांनी "पीएसएलव्ही सी-४४' या प्रक्षेपकाद्वारे या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. "कलामसॅट' हा विद्यार्थ्यांनी बनवलेला छोटा उपग्रह आहे. अवघ्या १.२ किलोग्रॅम वजनाचा हलका उपग्रह आहे. संरक्षण संशोधन संस्थेच्या प्रयोगशाळेत "मायक्रोसॅट आर' उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे. "मायक्रोसॅट-आर' हा २७४ किलोमीटर अंतरावर "सन सिंक्रोनस' कक्षेत सोडण्यात आला, तर कलामसॅट उपग्रह पृथ्वीपासून ४५० किलोमीटर अंतरावर स्थिर करण्यात आला. सुमारे ९० मिनिटांनी दोन्ही उपग्रहांना स्थिर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. "मायक्रोसॅट आर' हा लष्करी उपयोगासाठीचा उपग्रह आहे. मात्र त्याचे तपशील जाहीर करण्यात आलेले नाहीत. "कलामसॅट'साठी १२ लाख रुपये खर्च आला आहे. आपत्तीच्यावेळी मदतीसाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com