agriculture news in marathi, India lead in turmeric production, Maharashtra | Agrowon

हळद उत्पादनात भारत अग्रेसर
अभिजित डाके
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

देशात यंदा हळद उत्पादनात २० हजार मेट्रिक टनाने वाढ होण्याची शक्‍यता आहे. तसेच निर्यातदेखील वाढली आहे. परंतू हळद पावडरीची निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी गट स्थापन करून या माध्यमातून पावडरीची निर्यात करणे शक्‍य आहे. गटाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. 
- डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन,  योजना कसबे डिग्रज, जि. सांगली
 

सांगली ः भारत जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक देश आहे. जगात उत्पादित होणाऱ्या एकूण उत्पादनापैकी ७५ टक्के उत्पादन भारतात होते. गुणवत्ता चांगली असल्याने हळदीला देशांतर्गत आणि परदेशातही मोठी मागणी आहे. देशातून गेल्या पाच वर्षापासून हळदीची ८ ते १० टक्के निर्यात होत आहे. गेल्या वर्षी दाेन टक्‍क्‍यांनी वाढू होऊन १२ टक्के निर्यात झाली होती. 

गेल्या काही वर्षांत जगभरात हळदीचा वापर वाढला आहे. आयुर्वेदाचा प्रसारही वाढला आहे. त्यामुळे देशातील हळदीला जगभरात मागणी वाढली आहे. बहुगुणी हळद मोठे परकीय चलन मिळवून देत आहे. यामुळे देशात दरवर्षी हळदीच्या क्षेत्रात १ ते २ टक्‍क्‍यांनी वाढ होते आहे. सन २००८-०९ च्या दरम्यान हळदीच्या उत्पादनात घट झाली होती. यामुळे हळदीला चांगला दर मिळाला. यामुळे देशात सन २०१३ पासून २०१६ पर्यंत हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली. त्यानंतर मात्र उत्पादनात वाढ झाल्याने दरात घसरण झाली. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. परिमाणी हळदीच्या क्षेत्रात घट होऊन उत्पादन तब्बल निम्म्याने घटले. देशातील उत्पादन जरी घटले असले तरी जगातील उत्पादन आणि निर्यातीचा आलेख कायम राहिला आहे. 

उत्पादन वाढण्याची शक्‍यता 
गेल्या वर्षी देशातील हळद उत्पादन घेतल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही. यामुळे उत्पादनात घट झाली. परंतू यंदा वेळेत पावसाने हजेरी लावली. यंदा पीकही चांगले आहे. यंदाच्या हंगामात हळदीचे उत्पादन २० हजार टनाने वाढून देशात एकूण ४ लाख ६० हजार टन उत्पादन होण्याची शक्‍यता हळद संशोधन केद्राने व्यक्त केली आहे. 

पूरक उद्योगांना प्रोत्साहन हवे 
शासनाने हळद उत्पादकांसाठी प्रक्रिया उद्योगासाठी अनुदान दिले आहे. मात्र, हे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोचत नाही. यामुळे शेतकरी प्रक्रिया उद्योग करण्यासाठी पुढे येत नाहीत. मुळात व्यापाऱ्यांकडून हळदीची पावडर तयार केली जाते, आणि त्याची निर्यात केली जाते. पण हळद पावडर निर्यातीची संधी उपलब्ध करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होते आहे. 

निर्यातीचे चित्र 
गेल्या पाच वर्षांची हळद उत्पादनाची सरासरी विचारात घेतली तर भारतातून ८ ते १० टक्के निर्यात झाली आहे. मात्र, हळदीचा दर्जा चांगला असल्याने निर्यातीला अधिक संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे गेल्या वर्षी भारतातून हळदीची दाेन टक्‍क्‍यांनी निर्यात वाढली आहे. 

प्रतिक्रिया
कृषी विभागाने शेतकऱ्यांचे गट स्थापन करून त्यांना प्रक्रिया उद्योग उभे करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्याचा परवाना देण्यासाठी मार्गदर्शन करावे. त्याचप्रमाणे यासाठी गोदाम, निर्यातीच्या संधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्याव्यात. 
- मनोज पाटील, हळद उत्पादक, पोखर्णी, ता. वाळवा, जि. सांगली.

इतर अॅग्रो विशेष
कापूस लोकायची लाज राखते; पण आमचं काय? यवतमाळ : ‘‘आमच्या कापसापासून तयार कपड्यानं आमी...
कंपोस्ट खते बनविण्याच्या पद्धतीजमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा...
एकदम बाजार समित्या बरखास्त करू नका:...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...
पावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची...औरंगाबाद : लिंबूवर्गीय फळपिकात 'राजा' पीक म्हणून...
आंतरराष्ट्रीय द्राक्ष चर्चासत्र आजपासूनपुणे: राष्ट्रीय द्राक्ष संशोधन (एनआरसीजी)...
राज्यात पीकहानी ७० लाख हेक्टरच्याही...पुणे : केंद्र शासनाला पाठविल्या जाणाऱ्या अहवालात...
राज्यात गारठा वाढला; नगर १२.१ अंशावरपुणे : किमान तापमानात घट होत असल्याने राज्यात...
साखर कारखान्यांसाठी कर्ज परतफेडीचा...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने साखर कारखान्यांसाठी...
दोडका पिकाने उंचावले अर्थकारणधामणखेल (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील चंद्रकांत...
पेरू विक्रीसाठी प्रसिद्ध पेरणे फाटापुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्यांच्या...
जळगावचे उडीद मार्केट यंदा पोचले...उडीद उत्पादनात खानदेश अग्रेसर आहे. जळगावच्या...
पर्यायाविना निर्णय घातकच! ऑ नलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक...
नैसर्गिक आपत्तीपासूनचा धडा काही वेदनांमधून सुखद आनंदप्राप्ती होते, तर काही...
किमान तापमानात किंचित वाढपुणे  : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर...
बाजार समित्यांना सक्षम पर्याय द्याः...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...
पावसाने संत्र्यात ४० टक्के फळगळ; ४००...नागपूर : राज्याचे मुख्य फळपिकांत महत्त्वाचे स्थान...
हमीभावाने कापूस खरेदी २० नोव्हेंबरपासून...जळगाव : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व...
बारा लाख टन साखर निर्यातीचा मार्ग मोकळापुणे : केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे देशातील...
विमा कंपन्यांचे आस्ते कदम; पंचनाम्याकडे...पुणे : राज्यातील लाखो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त...
अकोला, बुलडाण्याला खरिपात ७२५ कोटींचा...अकाेला ः गेल्या महिन्यात झालेल्या संततधार पाऊस व...