'एफएओ'च्या महासंचालक पदासाठी रमेश चंद यांचे नाव

'एफएओ'च्या महासंचालक पदासाठी रमेश चंद यांचे नाव
'एफएओ'च्या महासंचालक पदासाठी रमेश चंद यांचे नाव

संयुक्त राष्ट्रसंघ : अन्न आणि कृषी संघटने (एफएओ)च्या महासंचालक पदासाठी रमेश चंद यांचे नामांकन भारताने सादर केले आहे. श्री. चंद हे निती आयोगाचे विद्यमान सदस्य आणि कृषी अर्थशास्त्र आणि धोरणांचे तज्ज्ञ आहेत.  एफएओने दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. जून २०१९ मध्ये एफएओच्या महासंचालक पदासाठी निवडणूक होत आहे. यात संघटनेच्या सदस्य देशांतून पाच देशांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. चार वर्षाकरिता या पदाचा कार्यकाळ असून, यंदा ऑगस्ट २०१९ पासून नव्या महासंचालकांचा कार्यकाळ सुरू होईल. २८ फेब्रुवारी ही अर्ज दाखल करण्याची शेवटी मुदत होती.  इतर उमेदवारांत मीद मॉन्गून (कॅमेरून), क्यू डोंग्यू (चीन), कॅथेरिन जेस्लीन लॅनिली (फ्रान्स)आणि डेवीट कीरव्हॅल्टीझ (जॉर्जिया) यांचा समावेश आहे. प्रति देश प्रति मत अशा स्वरूपात गुप्त मतदान होणार असून, सर्वाधिक मतदान मिळणार उमेदवार विजयी होणार आहे.  रोम येथे २२ ते २९ जूनदरम्यान एफएओच्या होत असलेल्या ४१व्या अधिवेशनात निवड होणार आहे. संघटनेचा नव्या महासंचालकांचा १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जुलै २०२३ दरम्यान कार्यकाळ असेल. तसेच अजून एक कार्यकाळासाठी त्यांना पुन्हा निवडीची संधी असते. जॉस गारझियानो डा सिल्वा हे विद्यमान महासंचालक असून, २०११ मध्ये ते पहिल्यांदा निवडणूक आले होते. सलग दोन टर्म ते महासंचालक होते. १९४५मध्ये एफएओच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत आठ महासंचालक झाले आहेत. यात १९५६ ते १९६७  बिनय रंजन सेन हे भारतीय महासंचालक होते.  विद्यमान उमेदवार श्री. चंद हे नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थे(आयएआरआय)तून कृषी अर्थशास्त्र विषयातील पीएचडीधारक आहेत. तसेच राष्ट्रीय कृषिशास्त्र अकादमी आणि भारतीय कृषी अर्थशास्त्र सोसायटीचे मानद सदस्य आहेत. श्री. चंद यांना कृषी अर्थशास्त्र संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील ३३ वर्षांचा अनुभव आहे आणि गेल्या १५ वर्षांपासून कृषी क्षेत्रातील धोरण निर्मिती क्षेत्रात ते कार्यरत आहेत. नीती आयोगात रूजू होण्यापूर्वी श्री. चंद हे राष्ट्रीय अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन संस्थेत संचालक होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com