Agriculture news in Marathi India should not change its import-export policy | Page 4 ||| Agrowon

भारताने आयात-निर्यात धोरणांत बदल करू नये

टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 एप्रिल 2021

केंद्र सरकारकडून आयात-निर्यातीच्या धोरणांमध्ये होत असलेल्या सततच्या बदलांमुळे निर्यातदार देश नाराज असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. भारताने किमान ३ महिने आयातीच्या नियमांमध्ये बदल करू नये, अशी मागणी या देशांनी केली आहे.

पुणे ः केंद्र सरकारकडून आयात-निर्यातीच्या धोरणांमध्ये होत असलेल्या सततच्या बदलांमुळे निर्यातदार देश नाराज असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. भारताने किमान ३ महिने आयातीच्या नियमांमध्ये बदल करू नये, अशी मागणी या देशांनी केली आहे. सध्या भारतात तूर, मूग, उडदाच्या आयातीवर कोटा लावण्यात आला आहे. तसेच मसूर आणि हरभऱ्याच्या आयातीवरही भक्कम आयात शुल्क आकारले जाते. एकेकाळी ४० लाख टन डाळींची आयात करणाऱ्या भारताची आयात गेल्या काही हंगामांपासून घटत आहे. त्यामुळे निर्यातदार देशांवर स्वतःच्या शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे हितसंबंध राखण्याचा दबाव आहे. त्यामुळे ही मागणी झालेली असू शकते. तर दुसरीकडे भारताचा विचार केल्यास डाळ उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळण्यासाठी विदेशी डाळींच्या आयातीवर काही प्रमाणात निर्बंध घालणे संयुक्तिक ठरते.

त्यामुळे निर्यातदार देशांच्या शेतकऱ्यांचा विचार करण्यापूर्वी केंद्राला भारतीय शेतकऱ्यांचा विचार करणे भाग आहे. मार्चमध्ये भारतातून ३ कोटी ४० लाख डॉलर मूल्याच्या शेतीमालाची निर्यात झाली आहे. याउलट गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा आयात मात्र ५३ टक्के घटली आहे. डाळींच्या आयातीत आलेली घट हा तुरीच्या आयातीवर असलेल्या निर्बंधांचा परिणाम म्हणावा लागेल. तसेच मसूर, हरभरा आणि मटारची आयात सध्याच्या आयात शुल्कात परवडणारी नाही. त्यामुळे फक्त उडदाची आयात सुरळीत सुरू आहे. मध्य प्रदेशात मोहरीच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. खरेदीला प्रतिसाद मिळत नसल्याचे हिंदी माध्यमांमधून कळते आहे. २९ मार्चपर्यंत मध्य प्रदेशात फक्त ०.०३ टन मोहरीची खरेदी पूर्ण झाली आहे. मोहरीला खुल्या बाजारात किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त भाव मिळत असल्याने सरकारी खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

नाफेडकडून ४.८ लाख टन तुरीची खरेदी
३१ मार्चपर्यंत देशातील विविध राज्यांमध्ये मिळून १०,९५६ टन तुरीची खरेदी करण्यात आली आहे. त्यात कर्नाटकातील ८९६९ टन, महाराष्ट्रातील १२६ टन, गुजरातेतील ५५५ टन, तमिळनाडूतील ३२ टन, आंध्र प्रदेशातील १०४ टन तुरीचा समावेश आहे. गेल्या वर्षी याच काळात नाफेडने ४.८ लाख टन तुरीची खरेदी केली होती. नाफेडकडे स्टॉक कमी असल्यास भविष्यात शेतकऱ्यांसाठी ते चांगले मानले जाते.


इतर अॅग्रोमनी
ब्राझीलला दणका; भारतीय साखर उद्योगास...जगात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांमुळे...
ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्डने अनिल जैन यांचा...जळगाव : पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘...
साखरच्या दरात २०० रुपयांनी वाढकोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढत...
कच्ची साखरनिर्यात यंदा फायदेशीर कोल्हापूर ः येत्या साखर हंगामात आंतरराष्ट्रीय...
उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्यप्रत्येक ‘एफपीओ’चे संचालक मंडळ पाचपेक्षा कमी...
राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...
भारतीय साखरेला थायलंडचे आव्हानकोल्हापूर : येत्या हंगामात साखरनिर्यातीसाठी...
जागतिक बाजारात साखर दरात घटकोल्हापूर : जगातील सर्वांत जास्त साखर उत्पादन...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
मोहरीतील तेजीची कारणे  वेगळीच ः विजय...नागपूर : बाजारात हमीभावापेक्षा मोहरीला जास्त दर...
प्रक्रियायुक्‍त खाद्यपदार्थांच्या...नवी दिल्ली : कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रांना मोठ्या...
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
इंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर...कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांत देशातून निर्यात...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
साखर निर्यातीचा ‘गोडवा’ वाढलाकोल्हापूर : केंद्राकडून साखर निर्यात धोरण जाहीर...
पाम तेल आयातीवर श्रीलंकेचा ‘सर्जिकल...कोलंबो : श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर...