कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
अॅग्रोमनी
भारतात यंदा ३६० लाख कापूस गाठींचे उत्पादन : सीएआय
भारतात यंदा ३६० लाख गाठींचे (१ गाठ = १७० किलो) उत्पादन होण्याच्या अंदाजावर कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआयने) कायम आहे.
मुंबई : भारतात यंदा ३६० लाख गाठींचे (१ गाठ = १७० किलो) उत्पादन होण्याच्या अंदाजावर कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआयने) कायम आहे. यंदा देशात कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असूनसुद्धा उत्पादनाच्या अंदाजात घट नोंदवलेली नाही. उत्पादनाच्या अंदाजाची उजळणी करणार असल्याचे वृत्त आले होते, मात्र ‘सीएआय’ अंदाजावर ठाम आहे.
बोंड अळी- बोंडसडीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगण ही अनुक्रमे देशातील मुख्य कापूस उत्पादक राज्ये आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात आणि तेलंगणमध्ये बोंड आळीमुळे उत्पादकतेला फटका बसला होता. टाळेबंदी उठल्यानंतर देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गिरण्यांकडून कापसाच्या मागणीत वाढ झाल्याने किमतीत सुधारणा झाली. सरकारच्या तिसऱ्या अगाऊ अंदाजानुसार कापसाचे ३७१ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित होते, हा अंदाज सप्टेंबरमध्ये जाहीर केला होता.
पाकिस्तानातही कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. जिनिंग कंपन्या पुन्हा सुरू झाल्याने कापसाच्या मागणीत वाढ झाली आहे. परंतु पुरवठा कमी झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही चीन आणि बांगलादेशकडून कापसाला चांगली मागणी आहे. ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत एकूण कापसाचा पुरवठा ३८६.२५ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. यामध्ये आवक झालेल्या २५५.२५ लाख गाठी, ३१ जानेवारीपर्यंत आयात केलेल्या ६ लाख गाठी आणि गेल्या वर्षीचा १२५ लाख गाठींच्या साठ्याचा समावेश आहे. सीएआयने ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत कापसाच्या ११० लाख गाठींचा वापर केल्याचा अंदाज आहे. याच दरम्यान २९ लाख गाठी कापूस निर्यात झाल्याचा अंदाज आहे. ३१ जानेवारीपर्यंत २४७.२५ लाख गाठी कापसाचा साठा असल्याचा अंदाज आहे.
एकूण कापसाचा देशांतर्गत कापसाचा मागणी ३३० लाख गाठी असल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मागणीत ३२ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी कापड गिरण्यांकडून २५० लाख गाठींची कापसाची मागणी झाली होती. टाळेबंदीमुळे कापूस गिरण्या बंद राहील्या होत्या. तसेच कारखाने सुरू झाल्यानंतरही त्यांना कामगारांची चणचण भसली होती. त्यामुळे मागील वर्षी एकंदर कापसाच्या मागणीत घट झाली होती.
या वर्षी कापसाच्या मागणी पूर्वपातळीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे, असे सीएआयने म्हटले आहे. देशांतर्गत उत्पादन, गेल्या वर्षीचा साठा आणि आयात मिळून यंदा कापसाचा ४९९ लाख गाठींचा पुरवठा झाला असल्याचा अंदाज आहे. म्हणजे यंदा पुरवठा आणि मागणीच्या वाढीचा अंदाज सीएआयने दिला आहे. असे असले, तरी यंदाच्या कापूस हंगामाच्या शेवटी कापसचा ११५ लाख गाठींचा शिल्लक साठा राहण्याचा अंदाज आहे, असे सीएआयचे म्हणणे आहे.
यंदा भारतातून ५४ लाख गाठींची निर्यात होण्याचा आंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निर्यातीत ४ लाख गाठींनी वाढ होणे अपेक्षित आहे, असे सीएआयने म्हटले आहे. त्यापैकी ३१ जानेवारीपर्यंत २९ लाख गाठींची निर्यात झाली होती. भारतीय कापूस महामंडळाची बांगलादेशबरोबर कापूस निर्यात करारची वाटाघाटी करत आहे. त्या व्यतिरिक्त चीन आणि अमेरिकन कापड गिरण्यांकडून कापसाला मागणी असल्याने भारतातून निर्यात होण्यास वाव आहे. तसेच पाकिस्तानमध्येही कापसाच्या उत्पादनात घट नोंदवली आहे. सूत गिरण्या आणि साठेबाजांकडे मिळून २४७ लाख गाठी कापसाचा साठा आहेत. तर कापूस महामंडळ, व्यापारी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडे १७२ लाख गाठींचा साठा आहे.
वर्ष | २०-२१ | १९-२० |
उत्पादन (लाख गाठी) | ३६० | ३६० |
देशांतर्गत मागणी (लाख गाठी) | ३३० | २५० |
निर्यात (लाख गाठी) | ५४ | ५० |
- 1 of 32
- ››