agriculture news in marathi, India works on Counter trade policy with Iran | Agrowon

तेल द्या आणि तांदूळ घ्या; भारताकडून 'काउंटर ट्रेड'चा पर्याय
प्राची चितळे जोशी
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दररोज घसरत चालला आहे. पैशाच्या रूपात व्यवहार करण्याला काही पर्याय सापडतो का हे शोधण्यात सध्या आपले सरकार व्यस्त आहे. पूर्वीच्या काळी लोक वस्तूंची अदलाबदल करत असत (बार्टर सिस्टिम). आधुनिक काळात त्याला `काउंटर ट्रेड` असे म्हटले जाते. बरेचसे देश या पर्यायाचा वापर करताना दिसत आहेत. डॉलरच्या तुलनेत आपला रुपया घसरू नये म्हणून हा पर्याय तितकासा योग्य नसला तरी याचा स्वीकार होताना दिसतोय. भारताने तांदळाच्या रूपात या काउंटर ट्रेडचा करार युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक्स (यूएसएसआर) सोबत केला होता.

अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दररोज घसरत चालला आहे. पैशाच्या रूपात व्यवहार करण्याला काही पर्याय सापडतो का हे शोधण्यात सध्या आपले सरकार व्यस्त आहे. पूर्वीच्या काळी लोक वस्तूंची अदलाबदल करत असत (बार्टर सिस्टिम). आधुनिक काळात त्याला `काउंटर ट्रेड` असे म्हटले जाते. बरेचसे देश या पर्यायाचा वापर करताना दिसत आहेत. डॉलरच्या तुलनेत आपला रुपया घसरू नये म्हणून हा पर्याय तितकासा योग्य नसला तरी याचा स्वीकार होताना दिसतोय. भारताने तांदळाच्या रूपात या काउंटर ट्रेडचा करार युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक्स (यूएसएसआर) सोबत केला होता. तसेच अलीकडच्या काळात २०१२-२०१५ दरम्यान इराण तेल निर्बंधात अडकलेला होता तेव्हा इराणशीही हा करार करण्यात आला होता.

इराणला डॉलरच्या रूपात रक्कम देण्यास अमेरिकेने घातलेल्या बंदीवर मात करून ४ नोव्हेंबर २०१८ मध्ये भारत इराणसोबत काउंटर ट्रेडचा नवीन करार करणार आहे. २०१७-२०१८ मध्ये भारताची एकूण तेल आयात ही जवळजवळ १५५ दशलक्ष टन एवढी होती. त्या पैकी इराणकडून १६ % म्हणजेच जवळजवळ २३ दशलक्ष टन आणि व्हेनेझुएलाकडून ११% म्हणजे १८ दशलक्ष टनपेक्षा जास्त तेलाची आयात आपण केली.
इराक, सौदी अरेबिया आणि इराण नंतर व्हेनेझुएला हा देश आपल्या देशाची तेलाची गरज भागवतो. या देशाची अर्थव्यवस्था आणि बॉलिवर चलन संपूर्णपणे ढासळले आहे. ते इतक्या मोठ्या प्रमाणात ढासळले की तेथील सरकारने सर्वप्रथम स्वतंत्र असे पेट्रो नावाचे क्रिप्टो-चलन चालू केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) क्रिप्टो-चलनांविरूद्ध आहे आणि भारत अन्न व औषधांच्या बदल्यात तेल पुरवठा करण्यासाठी व्हेनेझुएलाशी देखील करार करू शकतो.

भारताने जर दुसऱ्या देशांबरोबर अशाप्रकारचा व्यवहार केला अथवा डॉलरची उपेक्षा केली तर अमेरिका ते कधीही सहन करणार नाही. असे असले तरी आपण आपल्या फायद्याचा विचार करायला हवा. कमजोर देश, विशेषतः भरपूर तेलसाठा असलेले किंवा अमेरिकेच्या मर्जीत नसणारे देश यांच्यासोबत आपण देवाण-घेवाणीचे व्यवहार केले पाहिजेत. रशिया या व्यवहारासाठी सहज तयार होऊ शकतो. परंतु याची काळी बाजू अशी आहे की या सर्व देशांनी तेलाच्या बदल्यात फक्त तांदळाचीच मागणी केली तर आपली अवस्था अक्षरशः आगीतून फुफाट्यात अशी होईल. आम्ही तेलाच्या आयातीसाठी पैशाच्या बदल्यात तांदळाची अदलाबदल केली तर तांदळाच्या किमती आपल्या देशात वाढतील. इराणने तेलाची किंमत वाढवली आहे. त्यामुळे तेलाची आयात करण्यासाठी तांदळाची अदलाबदल ही गोष्ट तशी कठीण वाटतेय. हा व्यवहार आतबट्ट्याचा तर होणार नाही ना अशी शंका येऊ लागली आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) कडे निधीची वानवा आहे. मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन करण्यासाठी सरकार उत्तेजन देऊ शकते. आयओसीला अचानकपणे शेतीमध्ये उडी घेणे अशक्य आहे. त्यासाठी लागणारे कौशल्य, संसाधने आणि जमीन त्वरित मिळणे दुरापास्त आहे. मॅक्डोनाल्डने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांशी बटाटा आणि टोमॅटोची लागवड आणि पुरवठा करण्याचा करार केला आहे त्याप्रमाणे कंत्राटी शेती केली तर तांदळाच्या बाबतीत भारताची स्थिती सक्षम होईल. तेलाची आयात करण्यासाठी निधी म्हणून डॉलरकडे पाहण्यापेक्षा हे जरा सोपे पडेल. जर मॅक्डोनाल्डस अशा कराराद्वारे वेळेवर आणि ठरलेल्या किमतीत माल मिळवू शकतात तर आयओसीसुद्धा असे करार करून डॉलरच्या कचाट्यातून मुक्त होऊ शकते. गुणवत्तेचे सर्व निकष लावून या देवाणघेवाणीच्या व्यवहारात इतर अनेक वस्तूंचा सुद्धा सरकारने निश्चित विचार करावा.

इतर अॅग्रोमनी
ओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
बाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...
वायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...
सेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...
कापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....
घरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...
सुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...
सरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...
नेहे कुटुंबीयांनी कांदा पिकावर बसवले...नगर जिल्ह्यातील सावरगाव तळ (ता. संगमनेर) हे डोंगर...
गावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...
रब्बी हंगामातील आवकेचा दरावर परिणाम या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू,...
सुताचे दर वाढले जळगाव ः देशांतर्गत सूतगिरण्यांसमोर कापूस...
मका, हळद, कापसाचा तेजीकडे कलबाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या...
रुपयाचे अवमूल्यन, सरकीतील तेजीने कापूस...पुणे ः सध्या कापसाचे दर बाजारात ६५००...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...