agriculture news in marathi, Indian Ethanol to save countries one lakh crore rupees | Agrowon

स्वदेशी इथेनॉलमुळे एक लाख कोटींची होणार बचत

तात्या लांडगे
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

सोलापूर : यंदा पेट्रोलियम मंत्रालयास महाराष्ट्रातून 44 कोटी लिटर इथेनॉलचा कोटा अपेक्षित आहे. त्यामुळे सुमारे 12 हजार कोटींची बचत होणार आहे. भविष्यात इंधनात किमान 30 टक्‍के इथेनॉल मिसळल्यास सरकारची तब्बल एक लाख कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्यातून इंधनाचे दर आटोक्‍यात येण्यास मदत होईल, असा विश्‍वास कारखानदारांनी व्यक्‍त केला आहे.

सोलापूर : यंदा पेट्रोलियम मंत्रालयास महाराष्ट्रातून 44 कोटी लिटर इथेनॉलचा कोटा अपेक्षित आहे. त्यामुळे सुमारे 12 हजार कोटींची बचत होणार आहे. भविष्यात इंधनात किमान 30 टक्‍के इथेनॉल मिसळल्यास सरकारची तब्बल एक लाख कोटी रुपयांची बचत होणार आहे. त्यातून इंधनाचे दर आटोक्‍यात येण्यास मदत होईल, असा विश्‍वास कारखानदारांनी व्यक्‍त केला आहे.

परदेशातून इथेनॉल आयातीला सरकारने बंदी घालत स्वदेशातील कारखानदारांकडीलच इथेनॉल खरेदीला प्रोत्साहन दिले आहे. तसेच इंधनाचे दर कमी होण्यासाठी इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्प उभारणीवरील कर्जाचे निम्मे व्याज सरकार भरणार आहे. उसानंतर साखर आणि इथेनॉलसाठी हमीभाव देणारे भारत हे एकमेव राष्ट्र असल्याचा दावा कारखानदारांनी केला आहे. सध्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू व आंध्र प्रदेश या राज्यांत प्रामुख्याने इथेनॉल निर्मिती केली जाते.

  • इथेनॉल निर्मितीत महाराष्ट्र देशात अव्वल तर उत्तर प्रदेश दुसरे.
  • महाराष्ट्रातील 92 कारखान्यांद्वारे होतेय इथेनॉल निर्मिती
  • केंद्र सरकारद्वारे दरवर्षी 7.5 लाख लिटर क्रूड ऑइल आयात
  • सध्या इंधनात 10 टक्‍के इथेनॉल त्यात 30 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ अपेक्षित 
  • बी-हेव्ही इथेनॉलसाठी प्रतिलिटर 52.50 रुपये तर सी-हेव्हीसाठी 43.25 रुपये दर 
  • उसाच्या रसापासून थेट इथेनॉल मिळणार प्रतिलिटर 59.50 रुपये 
  • नगर (16) नंतर सोलापूर जिल्ह्यात (14) सर्वाधिक इथेनॉल निर्मिती कारखाने 

महाराष्ट्राची सद्यस्थिती 
इथेनॉल निर्मिती कारखाने : 92 
दररोज सरासरी क्षमता : 30,000 लिटर 
दरवर्षीचे अपेक्षित उत्पादन : 58.5 कोटी लिटर 
सरकारने दिलेला कोटा : 44.58 कोटी लिटर 
प्रत्यक्ष पुरवठा : 21.88 कोटी लिटर

बी-हेव्ही (साखर आणि इथेनॉलही तयार होते.), सी-हेव्ही (कमी साखर उत्पादन आणि इथेनॉलही) आणि थेट उसाच्या रसापासून (साखर उत्पादन नाही फक्‍त इथेनॉल) असे इथेनॉलचे तीन प्रकार आहेत. यापैकी बी-हेव्ही हा उत्तम पर्याय असून त्यातून शेतकऱ्यांना चांगला दर कारखानदारांना परवडेल. 
- उमेश परिचारक, इथेनॉल प्रकल्पधारक 


इतर अॅग्रो विशेष
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...
‘सिट्रस नेट’वर केवळ दोनशे शेतकऱ्यांची...नागपूर : प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ‘...
मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत...
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठापुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून...
जुलैअखेर पावसाने सरासरी गाठलीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची...
सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस...सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य...
मुगावर काय फवारायचे?अकोला ः कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
दूध दर आंदोलनाचा राज्यभर एल्गारपुणे: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व...
पीकविमा नोंदणीत महाराष्ट्राची आघाडीपुणे: डिजिटल तंत्राचा वापर करून पंतप्रधान पीकविमा...