पाकचे विमान हल्ला करायला घुसले आणि भारताने ते पाडले !

 पाकचे विमान हल्ला करायला घुसले आणि भारताने ते पाडले !
पाकचे विमान हल्ला करायला घुसले आणि भारताने ते पाडले !

नवी दिल्ली : बालाकोटमधील 'जैश ए महंमद'च्या तळावर घुसून भारतीय हवाई दलाने हल्ला केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आज (बुधवार) भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केली आणि काही बॉम्ब टाकले. पाकिस्तानी हवाई दलाचे एक विमान भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

'पीटीआय'ने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्‍मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात पाकिस्तानची विमाने आज भारतात घुसली होती. त्यांनी नौशेरा, पूंछ, राजौरी येथे बॉम्ब फेकल्याचे दावे पाकिस्तानकडून केले जात आहेत. 

In response to PAF strikes this morning as released by MoFA, IAF crossed LOC. PAF shot down two Indian aircrafts inside Pakistani airspace. One of the aircraft fell inside AJ&K while other fell inside IOK. One Indian pilot arrested by troops on ground while two in the area.

भारतीय हवाई दलाने काल केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर बिथरलेला पाकिस्तान काही ना काही पाऊल उचलणार, याचा अंदाज भारतीय सुरक्षा यंत्रणांना होताच. त्यामुळे पाकिस्तानच्या कुरापतीसाठी भारतीय यंत्रणा सज्ज होत्या. भारतीय हद्दीत पाकिस्तानची विमाने घुसल्यानंतर लगेचच भारतीय यंत्रणांनी प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानी हवाई दलाचे 'एफ-16' हे विमान पाडले. 

यानंतर विमानातून पॅराशूटद्वारे वैमानिक उतरत असल्याचे दृष्य पाहिल्याचे साक्षीदारांनी सांगितले आहे. पण अद्याप त्या वैमानिकासंदर्भात अधिक तपशील हाती आलेला नाही

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com