agriculture news in marathi Indian Kisan Sabha agitation for wet drought in Barshi | Agrowon

बार्शीत ओला दुष्काळ मागणीसाठी भारतीय किसान सभेचे आंदोलन

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

सोलापूर : ओला दुष्काळ जाहीर करा, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा बार्शी तालुका कौन्सिलच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

सोलापूर : ओला दुष्काळ जाहीर करा, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा बार्शी तालुका कौन्सिलच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले. या आंदोलनात बार्शी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, पिकांची, अवजारांची नुकसान भरपाई, सोयाबीन, तसेच इतर पिकांना प्रतिहेक्‍टरी ४५ हजार रुपये तातडीने मदत करा, घरांचे व शेतीचे वीज बिल पूर्ण माफ करा, रेशन धान्य मिळावे, ओढे-नाले फुटलेले आहेत, त्याची दुरुस्ती व्हावी, रस्ते महापुराने वाहून गेले आहेत, त्यांची दुरुस्ती व्हावी, श्रीपत पिंपरी येथील ओढ्यावरील पुलाची उंची वाढवावी, शेतकऱ्यांना २०१९-२० मधील दुष्काळ निधी द्या, बँकांकडून त्वरित कर्ज पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. 

पीक विमा मिळावा, पंचनाम्याचे घोडे नाचवत बसण्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांची सरसकट मदत व्हावी, ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली नाही, ती त्वरित मिळावी, चालू गळीत हंगामातील उसाला पाच हजार रुपयांप्रमाणे प्रतिटन भाव मिळावा, अशा मागण्याही आंदोलकांनी केल्या.

आंदोलकांचे निवेदन तहसीलदारांनी स्वीकारले. या वेळी लक्ष्मण घाडगे, प्रवीण मस्तूद, बाळासाहेब जगदाळे, अनिरुद्ध नकाते, भारत भोसले, पवार, शिवाजी घाडगे, बालाजी ताकभाते, सुभाष पिंगळे, पवन आहिरे, शापीन बागवान, बालाजी शितोळे, हरिभाऊ घाडगे, दत्तात्रय जगदाळे, पैगंबर मुलाणी, तानाजी काकडे, रामेश्वर शिकेतोड आदी उपस्थित होते.


इतर बातम्या
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
‘अटल भूजल’मध्ये जळगावातील चार तालुके जळगाव : तेरा जिल्ह्यांत एक हजार ३३९...
खासदार गोडसेंकडून कृषी योजनांच्या...नाशिक : शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने...
करमाळ्यातील खडकीत बिबट्यासदृष्य...करमाळा, जि. सोलापूर : खडकी (ता. करमाळा)...
खरेदी केंद्रात व्यापाऱ्यांचा कापूस घेऊ...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यात कापसाचे उत्पादन...
शिरपूर परिसरातील शिक्षक, मुख्याध्यापक `...शिरपूर, जि. धुळे : नववी ते बारावीचे वर्ग...
चोपडा तालुक्यात `हतनूर`चे पहिले आवर्तन...गणपूर, जि. जळगाव : हतनूर धरणातून...
नांदेड जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर हरभरा नांदेड : ‘‘यंदाचा समाधानकारक पाऊस आणि...
केंद्र सरकारचा समितीचा प्रस्ताव...नवी दिल्ली : विज्ञान भवनात झालेली बैठक कोणत्याही...
हिंगोली जिल्ह्यात मर रोगामुळे तूर लागली...हिंगोली : जिल्ह्यातील अनेक भागातील फुलोरा, शेंगा...
पीकविम्यासाठी कृषी विभागाकडे संपर्क करा...नांदेड  : ‘‘ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने...
बटाटा लागवड ठरली फायदेशीरमहाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्‍यातील कळंब, लौकी,...
साताऱ्यात ‘स्वाभिमानी’चे आंदोलनसातारा  : कृषी कायद्याविरोधात पंजाब व...
अकोल्यात रब्बीसाठी २९ कोटींचे कर्जवाटपअकोला : यंदाच्या रब्बी हंगामात लागवड ६५...
रब्बीच्या हंगामात विजेचा अडसररिसोड, जि. वाशीम  : सिंचन सुविधा निर्माण...
विमा कंपन्यांनी सरसकट भरपाई द्यावी - ...यवतमाळ :  जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार २१...
यंदा हिवाळ्यात गारठा जरा अधिकच राहणारपुणे : चालू वर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळा...
जागेअभावी संग्रामपुरात पाच दिवसांपासून...संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाकडे मका...
इथेनॉल प्रकल्प तारण घेऊन कारखान्यांना...पुणे : “राज्याच्या शेती व ग्रामीण अर्थकारणाला...
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय;...पुणे : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...