agriculture news in Marathi, Indian milk is highly safe, Maharashtra | Agrowon

भारतीय दूध सुरक्षित
वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

अभ्यास केलेल्या नमुन्यांपैकी केवळ १० टक्के (६३८) नमुन्यांमध्ये काही घटक आढळले आहेत, ज्यामुळे दूध पिण्यास असुरक्षित होते. हे  घटक प्रामुख्याने खाद्याची गुणवत्ता आणि प्रक्षेत्रातील अस्वच्छता यामुळे आढळले आहेत, तर ९० टक्के नमुने हे सुरक्षित आढळले.      
- पवन अगरवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘एफएसएसएआय’

नवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत प्रश्‍न उपस्थित होत असले तरीही फूड सेफ्टी अँड स्टॅन्डर्डस अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एफएसएसएआय) प्रकाशित केलेल्या अहवालात भारतीय दूध उच्च सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. ६ हजार ४३२ नमुन्यांचा विविध मापदंडांच्या आधारे व्यवस्थित अभ्यास करून हा निष्कर्ष काढल्याचे ‘एफएसएसएआय’ने म्हटले आहे. 

‘एफएसएसएआय’ने ‘दि रिपोर्ट आॅफ दि नॅशनल मिल्क क्विलिटी सर्वे-२०१८’ प्रसिध्द केला आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय दुधाच्या सुरक्षिततेविषयी तसेच गुणवत्तेविषयी सतत प्रश्‍न उपस्थित केले जातात. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेनेही यावर चिंता व्यक्त केली आहे. मात्र भारतातील दुधाचे ६ हजार ४३२ नमुने आणि विविध मापदंडाच्या आधारावर सर्वात मोठा अभ्यास करण्यात आला असून, त्यात भारतीय दूध अति सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे, असे ‘एफएसएसएआय’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. अहवालात काही अंशी दुधात भेसळ असल्याचे सांगितले आहे. मात्र देशातील कोणत्या भागातील नमुन्यांमध्ये भेसळ आढळली हे स्पष्ट केले नाही.

अगरवाल म्हणाले की, अभ्यासातील निष्कर्ष डेअरी उद्योग आणि राज्य सरकारांना देण्यात आले आहे, आणि त्यानंतर भेसळ रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय गेले जातील. कीटकनाशके उर्वरित अंशाविषयी काळजी करण्याची आवश्‍यकता नाही. तर केवळ १.२ टक्के नमुन्यांमध्ये प्रतिजैविके उर्वरित अंश कमाल मर्यादा पातळीपेक्षा अधिक आढळले आहेत आणि हे मख्य करून दुधाळ जनावरांना कासदाह आजारावर देण्यात येणाऱ्या आॅक्सी-टेट्रासायक्लीन या लसीमुळे अंश आढळले आहेत. तसेच फॅट आणि एसएऩएफच्या गुणवत्ता मापदंडाच्या अटीमध्ये उत्पादकांकडून येणारे दूध बसत नाही. प्रक्रिया केलेल्या दुधात गुणवत्ता मापदंडाच्या अटीपेक्षा घटक जास्त असतात, तर कच्च्या दुधामध्ये कमी असतात. ही बाब चिंतेची असून विविध उपायांद्वारे यावर तोडगा काढावा लागणार आहे. 

भेसळीचे प्रमाण कमी
भारतातील दूध मोठ्या प्रमाणात भेसळमुक्त आहे. अभ्यास केलेल्या ६ हजार ४३२ नमुन्यांपैकी केवळ १२ नमुन्यांमध्ये भेसळ झाल्याचे आढळले आहे. हे प्रमाण खूपच कमी आहे. सर्व्हेमध्ये खाद्य तेल, डिटर्जंट, ग्लूकोज, युरिया आणि अमोनियम सल्फेट यासारख्या १३ भेसळींची चाचणी करण्यात आली आहे. तसेच दुधाच्या नमुन्यांची प्रतिजैविके उर्वरित अंश (अँटिबायोटिक), कीटकनाशके उर्वरित अंश (पेस्टिसाइड) आणि अफ्लॅटॉक्झीन एम १ यांचीही पातळी तपासण्यात आली आहे, असे ‘एफएसएसएआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन अगरवाल यांनी सांगितले.   

इतर अॅग्रो विशेष
शेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...
लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...
राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाजपुणे : मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात...
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...