दहा राज्यात पोल्ट्री उद्याेग टांगणीला; शेतकरी, व्यावसायिक हताश

बर्ड फ्लूमुळे गेल्या काही दिवसात देशात हजारो पक्षी, कोंबड्या मृत्युमुखी पडत असल्याने देशभरातील कुक्कुटपालन उद्योगाला जबर नुकसान सहन करावा लागत आहे.
पोल्ट्री उद्याेग टांगणीला; शेतकरी, व्यावसायिक हताश
पोल्ट्री उद्याेग टांगणीला; शेतकरी, व्यावसायिक हताश

रांची/पाटणा/हैदराबाद, : बर्ड फ्लूमुळे गेल्या काही दिवसात देशात हजारो पक्षी, कोंबड्या मृत्युमुखी पडत असल्याने देशभरातील कुक्कुटपालन उद्योगाला जबर नुकसान सहन करावा लागत आहे. देशात आता दहा राज्यात बर्ड फ्लू पसरल्याचे निष्पन्न झाल्याने अनेक ठिकाणी पोल्ट्री बाजार तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.  झारखंडची राजधानी रांचीत कुक्कुटपालन व्यवसाय थंड पडला आहे. पोल्ट्री व्यावसायिक सनीकुमार साहू म्हणाले की, एरव्ही आपण कमी नफ्यावर व्यवसाय करतो. मात्र आता स्थिती बिकट झाली आहे. खूपच कमी लोक सध्या चिकनची खरेदी करत आहेत. अन्य व्यावसायिक संजय कुमार म्हणाले, की ही परिस्थिती कधी बदलेल हे आम्ही आताच सांगू शकत नाही. लोकांचा विश्‍वास जोपर्यंत बसणार नाही, तोपर्यंत बाजार गर्दी होणार नाही. सध्या ५० टक्क्यांपर्यंत बाजार उतरला आहे. पण अजून स्थिती नियंत्रणात आहे. बिहारचा कुक्कुटपालन व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. चिकन खरेदी करणे आणि खाणे याबाबत अजूनही ग्राहक सांशक आहेत, असे बिहारचे व्यावसायिक म्हणतात. अशीच स्थिती हैदराबादमध्ये दिसून येते. सध्याच्या काळात पोल्ट्री उत्पादने खरेदी करण्यास नागरिक फारसे उत्सुक नाहीत. तेलंगणमध्ये बर्ड फ्लूबाबत अफवा पसरल्याने ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे नामपल्ली बाजारातील पोल्ट्री चालक शाहेद खान यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारने पोल्ट्री व्यावसायिकांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. सध्याच्या काळात दुकानाचे भाडेही देऊ शकत नसल्याचे ते सांगतात. अगोदरच लॉकडाउमुळे मोठा आर्थिक फटका सहन केलेला असताना आता बर्ड फ्लूमुळे उरल्यासुरल्या आशाही मावळत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.  पंजाबमध्ये बाजारात घसरण बर्ड फ्लूचा पोल्ट्री बाजारावर विपरित परिणाम होत आहे. दोन दिवसांपासून मोहालीतील पोल्ट्रीत सध्या ४० टक्केच विक्री होत आहे. चिकन आणि अंड्याचे भाव घसरलेले असतानाही नागरिक खरेदीसाठी फारसे उत्सुक नाहीत. मोहाली जिल्ह्यात दररोज २० ते २५ हजार कोंबड्याची विक्री होते तर ८५ हजार अंड्यांची विक्री होते. अनेक ठिकाणी चिकन व्यावसायिक दहा ते तीस रुपयांपर्यंत सवलत देत आहेत. अंड्यांच्या ट्रेवर देखील सवलत देत आहेत. तरीही प्रतिसाद मिळत नाही.  प्रतिक्रिया.. पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण होत असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून पसरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. चंडीगडच्या बाजारात खूप गर्दी होती, परंतु आता ग्राहकांची संख्या रोडावली आहे. पोल्ट्रीवरचे काम खूपच कमी झाले आहे. किंमत कमी असतानाही लोक चिकन खरेदी करताना दिसत नाहीत.  - चंडीगड येथील चिकन विक्रेता  बाधित राज्य  नवी दिल्ली, महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाना, गुजरात  भारतातील कुक्कुटपालन उद्योगाचे एकूण मूल्य  १ लाख कोटी किंवा १५.३८ अब्ज डॉलर  २०१७ -१८ मधील उत्पादन  अंडी............ब्रॉयलर  ७५ अब्ज........ ४.२ दशलक्ष टन 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com