भारतीय लाल मिरचीची जगाला भुरळ

देशातील लाल मिरचीला निर्यातीसाठी मागणी वाढत असल्याने गेल्या काही दिवसांत दरात सुधारणा झाली आहे. आंध्र प्रदेशातील बेंचमार्क मार्केटमध्ये खरेदीदार सौद्यांत मोठ्या उत्साहाने उतरले आहेत.
भारतीय लाल मिरचीची जगाला भुरळ Indian red pepper captivates the world
भारतीय लाल मिरचीची जगाला भुरळ Indian red pepper captivates the world

पुणे : देशातील लाल मिरचीला निर्यातीसाठी मागणी वाढत असल्याने गेल्या काही दिवसांत दरात सुधारणा झाली आहे. आंध्र प्रदेशातील बेंचमार्क मार्केटमध्ये खरेदीदार सौद्यांत मोठ्या उत्साहाने उतरले आहेत. त्यातच बांगलादेश आणि चीनमधील मिरचीचे खरेदीदार आयातीसाठी विचारणा करत आहेत. त्यामुळे दरात सुधारण होण्यास मदत मिळत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  देशात आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांत मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. या पट्ट्यात मिरचीची लागवड नुकतीच संपली असून उत्पादनात होण्याचे संकेत आहेत. विदेशातून मागणी लक्षात घेता पुढील काळात निर्यात सौदे वाढण्याची शक्यता आहे. यंदा मिरची पिकाला आवश्यक असलेला पाऊस चांगला झाला आहे. तसेच सध्या होत असलेल्या पावसामुळे मिरची उत्पादक पट्ट्याला दिलासाही मिळण्याची शक्यता असून उत्पादनात वाढ होण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे.  मसाले निर्यातीत मिरचीची निर्यात सर्वाधिक होत आहे. २०१९-२० मध्ये देशातून ४.९६ लाख टन लाल मिरचीची निर्यात झाली होती. त्यातून देशाला ६७१ कोटी रुपायांचे विदेशी चलन मिळाले. तर २०२०-२१ मध्ये निर्यात ६.०२ लाख टन झाली होती. त्यातून ८४३ कोटी रुपये मिळाले. गेल्या दोन वर्षांतील निर्यातीचा विचार करता निर्यातीत २१ टक्के झाली आहे. तर निर्यातीतून मिळणाऱ्या मूल्यात २६ टक्के वाढ झाली आहे. भारत प्रमुख निर्यातदार भारतात पिकणाऱ्या लाल मिरचीला जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात मागणी असते. लाल मिरचीचा भारत हा प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. आता लागवड झालेल्या मिरचीची डिसेंबर ते जानेवारीदरम्यान बाजारात आवक होण्याची शक्यता आहे. तसेच आंद्र प्रेदश आणि तेलंगणात मिरचाचा साठा उपलब्ध असल्याने निर्यात मागणी देश यंदा पूर्ण करू शकणार आहे. यंदा देशातून निर्यात वाढण्याचीही शक्यता जाणकरांनी व्यक्त केली आहे. गुंटूर बाजारात दर सुधारले गुंटूर बाजारात मागील काही दिवसांचा विचार करता दरात प्रतिक्विंटमागे १०० ते १५० रुपयांची सुधारणा झाली आहे. गुंटूर बाजारात २८ सप्टेंबरला ८० हजार पोत्यांची (प्रतिपोते ४० किलो) आवक झाली होती, तर २९ सप्टेंबरला ७५ हजार पोत्यांची आवक झाली होती. येथील बाजारात तेजा वाणाच्या मिरचीला प्रतिक्विंटल १३०० ते १४५०० रुपये दर मिळत आहे. तर एलसीए ३३४ वाणाच्या मिरचीला ९००० ते ११५०० रुपये दर मिळत आहे. २० सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या दोन दिवसांतच मिरचीच्या दरात १०० रुपयांची सुधारणा झाली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com