agriculture news in Marathi Indian sugar has demand from Indonesia and Iran Maharashtra | Agrowon

इंडोनेशिया, इराणकडून साखरेला मागणी 

राजकुमार चौगुले
मंगळवार, 5 मे 2020

मे महिन्यात साखर उद्योगासाठी सकारात्मक गोष्टी घडू शकतात. साखर कारखान्यांनी जास्तीत जास्त निर्यात करावी यासाठी आम्ही कारखान्यांना निर्यात करण्याचे आवाहन करणारे पत्र पाठविले आहे. पत्रात निर्यात केल्यानंतर काय फायदे होवू शकतात याचे स्पष्टीकरण केले आहे. निर्यात न झाल्यास होणारे तोटेही कारखान्यांना आम्ही सांगितले आहेत. यामुळे आगामी काळात साखर निर्यात गती घेइल अशी शक्‍यता आहे. 
- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

कोल्हापूर: गेल्या दोन महिन्यांपासून साखर निर्यातीबाबत निराशेच्या गर्तेत सापडलेल्या साखर उद्योगाला आता इंडोनेशिया आणि इराणने दिलासा दिला आहे. दोन्ही देशांत लॉकडाऊनमुळे साखरेची चणचण भासू लागली आहे. यामुळे या देशांनी भारतीय साखरेला पसंती दिली आहे. 

स्थानिक बाजारात उठाव नसला तरी निर्यातीला अनुकुल वातावरण निर्माण होत आहे. दोन्ही देशांकडून भारतीय साखरेला मोठी मागणी अपेक्षित आहे. त्या दृष्टीने हालचालीही सुरु झाल्या आहेत. ही बाब मरगळेल्या साखर उद्योगाच्या पथ्यावर पडणार आहे. दुसरीकडे बंदरावरील अडचणी दूर होत आहेतच पण पांढऱ्या साखरेचे दरही काही प्रमाणात वाढल्याने या सगळ्याचा एकत्रीत सकारात्मक परिणाम पावसाळ्यापूर्वी दिसून येण्याची शक्‍यता आहे. 

बंदरातून निर्यातीसाठी पोषक वातावरण 
मुंबई बंदर वगळता इतर बंदरातून मजूर उपलब्ध होवू लागल्याने साखर निर्यातीसाठी जहाजे उपलब्ध होत आहेत. मार्चचा उत्तरार्ध ते एप्रिलच्या शेवटच्या सप्ताहापर्यत निर्यातीसाठी असणारी प्रतिकुल परिस्थिती आता बदलत आहे. यामुळे साखर निर्यातीसाठीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. रखडलेली साखरही निर्यातीच्या मार्गावर आहे. इंडोनेशिया व इराण मध्ये लॉकडाऊन मुळे साखरेची चणचण भासू लागली. याचा परिणाम तेथील देशातील साखर दर वाढण्यावर झाला. मागणी व पुरवठा नियंत्रित करण्यासाठी दोन्ही देश आयातीचे पर्याय शोधत आहेत. त्यांचा कल भारतीय साखरेकडे रहात असल्याने हे भारतीय साखरसाठी सुचिन्ह असल्याचे साखर उद्योगातील तज्ञांनी सांगितले. 

दरात वाढ 
एकीकडे निर्यातीसाठी सकारात्मक बाबी घडत असताना दरही समाधानकारक बनल्याने त्याचा फायदा कारखानदारांना होवू शकतो. सध्या पांढऱ्या साखरेला क्विंटलला २१०० ते २२०० रुपये दर मिळत आहे. यात केंद्राचे अनुदान गृहीत धरल्यास साखर कारखान्यांना साखरेची किमंत ३१०० रुपयापर्यंत मिळू शकते. यामुळे दराच्या पातळीवरही साखरेचा गोडवा काही अंशी का होईना वाढणार आहे. 

केंद्राकडून प्रयत्न 
केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण विभागाने १ मे ला एक अधिसुचना जारी केली आहे. साखर निर्यातीसाठी माहिती देण्याची मुदत २० जूनपर्यत वाढविली आहे. यापूर्वी ती ३१ मार्च इतकी होती. या अधिसूचनेमुळे कारखान्यांना जूनपर्यंत जास्तीत जास्त साखर निर्यात करता येवू शकेल असे साखर उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितले. केंद्राने जे कारखाने या कालावधीत निर्यात करणार नाहीत. त्यांचा कोटा इतर कारखान्यांना देण्याचेही सूचित केले आहे. 

प्रतिक्रिया
केंद्राने जे कारखाने साखर निर्यात करणार नाही त्यांचा कोटा इतर कारखान्यांना देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. महाराष्ट्रातही अनेक कारखाने निर्यातीसाठी इच्छुक आहेत. त्यांचा कोटा संपल्याने ते जादा निर्यात करु शकत नाहीत. अशा कारखान्यांना महाराष्ट्रातीलच निर्यात न करणाऱ्या कारखान्यांचा कोटा दिल्यास राज्यातील साखर गतीने निर्यात होवू शकेल 
- अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार कोल्हापूर 


इतर अॅग्रोमनी
खाद्यतेल आयातीत १२ टक्के घटपुणे ः देशात २०१९-२० (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये...
चांगल्या बाजारभावासाठी ‘एनसीडीईएक्स’चा...शेतकऱ्यांसाठी दराचे संरक्षण (प्राइज इन्शुरन्स)...
‘जीआय’प्राप्त उत्पादनांच्या ब्रँडिंगवर...नाशिक : भारतीय शेतीमाल व खाद्यपदार्थांना जगभर...
ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्पादन...सध्या शेतकरी कायद्यामध्ये बदल झाल्यानंतर करार...
जळगावच्या सुवर्ण बाजाराला झळाळीजळगाव ः शुद्धता, सचोटीसाठी प्रसिद्ध असलेल्या...
सोयाबीनची चाल पाच हजारांकडे  पुणे ः देशांतर्गत बाजारातील कमी आवक, शिकागो बोर्ड...
बेदाणा दरात सुधारणासांगली ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून...
नाईक सूतगिरणीचा कंटेनर निघाला चीन,...पुसद, जि. यवतमाळ : लॉकडाउन काळात पिंपळगाव कान्हा...
बांगलादेशच्या वस्त्रोद्योगात चीनची मोठी...जळगाव ः भारतीय कापसाचा सर्वांत मोठा खरेदीदार...
साखर निर्यात यंदा ठरणार फायदेशीरकोल्हापूर : साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या...
सांगलीत हळदीची उलाढाल २८० कोटींनी घटलीसांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद...
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तांदळाची विक्रमी निर्यात होणार पुणे: देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस...
देशातून ३५ लाख कापूस गाठींची निर्यात...जळगाव ः जगभरात कापूस पिकाला नैसर्गिक फटका बसतच...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
बंगलोर रोझ, कृष्णपुरम वाणाचा दहा हजार...नाशिक : बंगलोर रोझ व कृष्णपुरम छोट्या आकाराच्या...
डाळींच्या दरात दहा टक्के वाढ मुंबई : पालेभाज्या, कांदा, बटाटा यांसह आता...
जागतिक कापूस उत्पादन घटणार; ...जळगाव ः जागतिक कापूस उत्पादन नव्या म्हणजेच २०२०-...