भारतात कोरोनामुळे मृत्युदर जास्तच; जागतिक आरोग्य संघटनेचे निरीक्षण

नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोरोना संसर्गामुळे भारतात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण आणि सरासरी हे चीन, स्पेन, अमेरिका आणि इटलीसारख्या देशांपेक्षा जास्त आहे.
भारतात कोरोनामुळे मृत्युदर जास्तच; जागतिक आरोग्य संघटनेचे निरीक्षण
भारतात कोरोनामुळे मृत्युदर जास्तच; जागतिक आरोग्य संघटनेचे निरीक्षण

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोरोना संसर्गामुळे भारतात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण आणि सरासरी हे चीन, स्पेन, अमेरिका आणि इटलीसारख्या देशांपेक्षा जास्त आहे. दरम्यान प्रगत देशांच्या तुलनेत भारतातील फैलाव आटोक्यात असून परिस्थिती चांगली आहे असे केंद्र सरकारकडून सातत्याने सांगण्यात येत असतानाच आरोग्य संघटनेचे हे नवे निरीक्षण समोर आले आहे. सध्या कोरोनाच्या संसर्गाने विकसित देशांमध्ये थैमान घातले असून बळी आणि बाधितांच्या संख्येमध्येही झपाट्याने वाढ होते आहे. भारतामध्ये कोरोनाचा मृत्युदर अधिक आहे. आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार भारतामध्ये एक लाख ७१ हजार लोकांच्या चाचण्या केल्यानंतर यातील ७ हजार ७०० लोकांना कोरोना संक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी २४० जणांनी प्राण गमावले आहेत. अमेरिकेत ७०८७ लोक जेव्हा कोरोनाग्रस्त होते तेव्हा त्यातील शंभर लोक मृत्युमुखी पडले होते. चीनमध्ये हे प्रमाण १७० इतके होते. जर्मनीमध्ये तर ७ हजार १५६ जणांना कोरोनाची लागण झाली तेव्हा त्यातील फक्त १३ लोकांना प्राण गमवावे लागले होते.

म्हणून आशादायी चित्र प्रगत देशातील रुग्णसंख्या आणि मृत्यू संख्या बघून आपल्याकडे विकसित देशांपेक्षा परिस्थिती चांगली असल्याचे जे चित्र उभे केले जात आहे ते तुलनेत वास्तवाशी फारसे निगडित नसले तरी भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशातील नागरिकांमध्ये घबराट पसरू नये आणि सकारात्मक वातावरण कायम राहावे हा केंद्राचा त्यामागील उद्देश असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ...... भारतातील सरासरी रुग्ण संख्या : ३० जानेवारी -------------- १ २८ मार्च ---------------- १००० १ एप्रिल ---------------- २००० ३ एप्रिल ---------------- ३००० ५ एप्रिल ---------------- ४००० ७ एप्रिल ---------------- ५००० ९ एप्रिल ---------------- ६००० १० एप्रिल ---------------- ७००० ११ एप्रिल ---------------- ८००० १२ एप्रिल ---------------- ८३५६ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com