भारताचा विकासदर दीड टक्क्यांवर येणे शक्य : जागतिक बँकेच्या अंदाज

वॉशिंग्टनः चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा अंदाजित विकासदर १.५ ते २.८ टक्के टक्के इतका राहण्याचा अंदाज जागतिक बॅंकेने वर्तवला आहे. १९९१नंतर आर्थिक सुधारणा झाल्यानंतरचा भारताचा हा नीचांकी विकासदर असणार आहे.
भारताचा विकासदर दीड टक्क्यांवर येणे शक्य : जागतिक बँकेच्या अंदाज
भारताचा विकासदर दीड टक्क्यांवर येणे शक्य : जागतिक बँकेच्या अंदाज

वॉशिंग्टन ः चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा अंदाजित विकासदर १.५ ते २.८ टक्के टक्के इतका राहण्याचा अंदाज जागतिक बॅंकेने वर्तवला आहे. १९९१नंतर आर्थिक सुधारणा झाल्यानंतरचा भारताचा हा नीचांकी विकासदर असणार आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत विकासदरात मोठी घट होणार आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था १.५ टक्के ते २.८ टक्के विकासदर नोंदविला जाण्याची शक्यता आहे, असे मत जागतिक बॅंकेने आपल्या दक्षिण आशिया आर्थिक उद्दिष्ट अहवालात म्हटले आहे. ३१मार्च अखेर सरलेल्या २०१९-२०या आर्थिक अहवालात भारताचा विकासदर ४.८ टक्के ते ५ टक्के राहण्याचा अंदाज जागतिक बॅंकेने व्यक्त केला आहे.

वित्तीय क्षेत्रातील अडचणींमुळे आधीच भारतीय अर्थव्यवस्था मंदावलेली असतानाच कोविड-१९चे संकट उद्भवले आहे. कोरोनाच्या संकटाला आळा घालण्यासाठी सरकारने देशभर लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प झाले आहेत. यामुळे बाजारातील वस्तूंची मागणी आणि वस्तूंचा पुरवठा या दोन्हींच्या बाबतीत संकट निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम होत २०२०-२१ या आर्थिक वर्षात विकासदरात मोठीच घट होणार आहे, असे जागतिक बॅंकेच्या अहवालात म्हटले आहे.

त्यापुढील आर्थिक वर्षात म्हणजे२०२०-२१ या आर्थिक वर्षात कोविड-१९संकट टळल्यामुळे आणि सरकारकडून विविध पावले उचलण्यात आल्यामुळे भारताचा विकासदर सुधारून ५ टक्क्यांवर जाण्याची शक्यता जागतिक बॅंकेने व्यक्त केली आहे. याआधी एशियन डेव्हलपमेंट बॅंकेनेसुद्धा भारतीय विकासदरात घट होत तो ४ टक्क्यांवर जाण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com