मसाले निर्यातीत ३५ टक्क्यांनी वाढ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई ः भारतातून विविध देशांत होणाऱ्या मसाले निर्यातीत गेल्या एप्रिल-जूनदरम्यान ३५ टक्क्यांनी वाढ झाली अाहे. या काळात होणारी निर्यात २,२७,९३८ टनांवरून ३,०६,९९० टनांपर्यंत वाढली अाहे. तर निर्यात होणाऱ्या मसाले पदार्थ्यांच्या मूल्यात २ टक्क्यांनी वाढ होऊन ती ४५.८९ अब्ज रुपयांवर पोचली अाहे, असे भारतीय मसाले मंडळाने दिलेल्या अाकडेवारीवरून दिसून अाले अाहे.

मसाले पदार्थांच्या निर्यातीत मिरचीने अाघाडी घेतली अाहे. यंदा (२०१७-१८) पहिल्या तिमाहीत मिरचीच्या निर्यातीत ७५ टक्क्यांनी वाढ झाली अाहे. यंदा देशातून एकूण १,३३,००० टन मिरचीची निर्यात झाली अाहे. भारतात मोठ्या प्रमाणात मसाले उत्पादन घेतले जाते.

मसाले निर्यात करणारा भारत हा जगातील सर्वांत मोठा अाहे. देशातून मिरचीसह, जिरा, हळद, वेलदोडे, लसूण, काळी मिरी, मेथी अादी मसाल्यांची निर्यात केली जाते. मुख्यतः भारतीय मसाल्यांना अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, व्हिएतनाम, सौदी अरेबिया, श्रीलंका, नेदरलॅंड, जपान, स्वीडन, कॅनडा, इराण, अाॅस्ट्रेलिया, इटली, चीन, थायलंड, बांगलादेश अादी देशांतून मागणी अाहे.

छोटे वेलदोडे निर्यातीत १० टक्क्यांनी वाढ झाली अाहे. गेल्या वर्षी १,१०६ टन छोटे वेलदोडे निर्यात झाली होती. यंदा निर्यात १,२२० टनांवर पोचली अाहे. जिरा निर्यात ४३,००० टन एवढी झाली अाहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत ४२,९८७ टन एवढी झाली होती.

लसूण निर्यातीत सर्वाधिक १६९ टक्क्यांनी वाढ झाली अाहे. बडीशोप अाणि अाल्याच्या निर्यात अनुक्रमे ९२ अाणि ७० टक्क्यांनी वाढली असल्याचे दिसून अाले अाहे. काळी मिरी, धणे निर्यातीत घट देशातून निर्यात होणाऱ्या काळ्या मिरीच्या निर्यातीत १३ टक्क्यांनी घट झाली अाहे. तसेच धणे निर्यातीतही १० टक्क्यांनी घट झाली अाहे. पहिल्या तिमाहीत ८,९०० टन धणे निर्यात झाली अाहे.

२०१७-१८ (एप्रिल-जून) मधील मसाले निर्यात

 
मसाले पदार्थ २०१७(नग) २०१६(नग) २०१७ (मूल्य) २०१६ (मूल्य)
मिरची १,३३,००० ७६,०३७ ११,९८० ११,२७२
जिरा ४३,००० ४२,९८७ ६,९१० ६,८४९
हळद ३१,८०० ३०,८१२ ३,०५० ३,४४८
मिरी ३,९०० ४,४६५ २,१८० २,८४६
छोटे वेलदोडे १,२२० १,१०६ १,३४५ ९०८
लसूण १८,००० ६,६९३ १,२३८ ५९६
धणे ८,९०० ९,८७५ ७१२ ९२१
अाले ७,७५० ४,५६३ ५९६ ७१८
मेथी ९,८८० १२,९८४ ४१६ ६८९
इतर मसाले ११,७५० १०,६७७ १,३२० १,२४१

- (नग- टनामध्ये, मूल्य-दशलक्ष रुपये) स्रोत ः भारतीय मसाले मंडळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com