अजितदादा पालकमंत्री होण्याच्या संकेतांनी कार्यकर्त्यांत उत्साह

Indication of becoming Dada guardian minister
Indication of becoming Dada guardian minister

पुणे ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार अजित पवार यांच्याकडे सध्यातरी कोणतेही मंत्रिपद नसले तरी आपणाकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद येणार असल्याचे संकेत त्यांनी दिल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. 

पवार यांनी शनिवारी (ता. १४) जिल्हा परिषद, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या आढावा बैठकांसह कार्यकर्ता मेळावादेखील घेतला. फडणवीस सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांवर फेरविचार करून, अनेक निर्णय बदलणार असल्यातेही सूतोवाच श्री. पवार यांनी केले. यामध्ये प्रामुख्याने थेट सरपंच आणि नगराध्यक्षांच्या निवडणुका आणि बाजार समित्यांच्या निवडणुकांच्या निर्णयांचा समावेश आहे. 

जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या बैठकीत श्री. पवार म्हणाले, ‘‘थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष आणि बाजार समितीचा संचालक निवडण्याच्या निर्णयांबाबत पुनर्विचार केला जाईल आणि पूर्वीप्रमाणे बहुमताच्या आधारे सरपंच, नगराध्यक्षांची निवड केली जाईल.’’

तसेच पक्ष सोडून गेलेल्यांना थारा नसल्याचे त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात निक्षुण सांगितले. ते म्हणाले, ‘‘पक्ष सोडून गेलेल्यांना पक्षात घेऊ नका. तसा काही शब्दही त्यांना देऊ नका, अशी ताकीद देत पक्षविरोधी कारवायांना थारा देणार नाही, ही मंडळी कार्यक्रमात येतील तेव्हा, मला सांगा मी लगेचच त्यांना बाहेर काढेल,’’ असा शब्दही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. या वेळी खडकवासल्यात पाडापाडीचे राजकारण झाले, धनकवडीतून साथ मिळाली असती तर तिसराही आमदार झाला असता, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.  

मीच होणार पालकमंत्री पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासूनच बैठका होतील. प्रशासनात काही बदल करण्याचे सांगत भाजपप्रेमी अधिकाऱ्यांना त्यांनी इशारा देत, आपणच पालकमंत्री राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. तर पुणे शहरासह जिल्ह्यातील शेतीला पुरेसे पाणी देण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी मुळशी धरणातून पाणी आणण्याची योजना आहे. त्यासाठी टाटा कंपनीशी पक्षाध्यक्ष शरद पवार बोलतील. त्यामुळे या योजनेत अडचणी येणार नाहीत. 

अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार  पिंपरी येथे झालेल्या मेळाव्यात पवार म्हणाले, ‘‘सध्याचे मंत्रिमंडळ सात जणांचे असले ते अनुभवी आहेत. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, सर्व खाती अधिककाळ रिक्त ठेवता येणार नाहीत. एका मंत्र्याकडे किती खात्यांची जबाबदारी सोपवायची याला मर्यादा आहेत. त्यामुळे अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. विधिमंडळाच्या माध्यमातून जनतेला महाविकास आघाडीची भूमिका समजेल. अधिवेशनात प्रामुख्याने विदर्भातील प्रश्‍नांवर भर असेल. सध्याचे मंत्री अनुभवी आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com