देशी कोंबडी पिलांच्या मागणीत ७० टक्के घट 

बर्ड फ्लूची लाट ओसरली आहे. मात्र तरीही गेल्या दीड महिन्यापासून राज्यात देशी कोंबड्यांच्या पिलांच्या मागणी सत्तर टक्क्यांनी घटली आहे. याशिवाय पिलांच्या दरातही निम्म्याने घट झाली आहे.
gavran chicken
gavran chicken

नगर ः बर्ड फ्लूची लाट ओसरली आहे. मात्र तरीही गेल्या दीड महिन्यापासून राज्यात देशी कोंबड्यांच्या पिलांच्या मागणी सत्तर टक्क्यांनी घटली आहे. याशिवाय पिलांच्या दरातही निम्म्याने घट झाली आहे. 

देशात दर महिन्याला एक कोटीपेक्षा अधिक कोंबड्यांचे उत्पादन करतात. यात एकट्या नगर जिल्ह्यात ८० हजार देशी कोंबड्यांचे महिन्याला उत्पादन होते. दीड महिन्यापासून काही भागांत बर्ड फ्लूची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर देशी पिलांची मागणी घटली आहे. त्यामुळे देशी पिलांचे उत्पादनही सत्तर टक्क्यांनी कमी आले आहे. शिवाय साधारणपणे पंचवीस रुपये असलेला पिलांचा दर पंधरा रुपयांवर, तर चिकनचा दरही ८० ते ९० रुपयांवर आला आहे. केवळ अफवेमुळे देशी चिकन उद्योग, अर्थात शेतकरी अडचणीत आला असून, कोट्यवधींचा फटका सोसावा लागत आहे.  असोसिएशन करणार जनजागृती  नगर जिल्ह्यात सर्वाधिक देशी चिकन उद्योग असल्याने बुधवारी नगरला देशी पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष संतोष अंकुश कानडे, उपाध्यक्ष विलय माचवे, सचीव संजय निगडे, नितीन मुनोत, दत्त सोनटक्के, दीपक गोळक, विठ्ठल जाधव, सुनील चोर, कैलास झरेकर, शिवाजी शिंदे, जितू मुनोत यांच्यासह पोल्ट्री उद्योजक व पिले उत्पादक हॅचरी चालकांची बैठक झाली. केवळ अफवेमुळे आणि भीतीपोटी देशी चिकनची मागणी घटली आहे. लोकांनी कोरोना संसर्गाच्या काळात चिकन खावे, चिकन खाण्याला कोणताही धोका नाही, असे सांगत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.  ब्रॉयलर कोंबड्यांचेही उत्पादन घटले  गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात केवळ अफवेमुळे कुक्कुट उद्योगाला दोन हजार कोटींचा आर्थिक फटका सोसावा लागला होता. आता दीड महिन्यापासून बर्ड फ्लूमुळेही मोठा फटका बसत आहे. राज्यात दर महिन्याला दीड लाख शेतकरी ४ कोटी कोंबड्यांचे उत्पादन घेतात. मात्र दरात घसरण व मागणी घटल्याने सध्या दोन कोटी कोंबड्या महिन्याला उत्पादित होत आहेत. त्यामुळे पिलांची मागणी पन्नास टक्क्यांनी घटली आहे. प्रति किलो ८० ते १०० रुपयांपेक्षा अधिक मिळणारे ब्रॉयलर चिकनचे दर गेल्या काही दिवसांपासून थेट ५५ ते ६० रुपयांवर आले आहेत. कुक्कुट उद्योगातील जाणकारांच्या माहितीनुसार दीड महिन्यात ब्रॉयलर कुक्कुट उद्योगाला दोन हजार कोटींपेक्षा अधिक फटका बसला आहे.  प्रतिक्रिया बर्ड फ्लूचा धोका आता संपल्यासारखा आहे. मुळात बर्ड फ्लूमुळे चिकन खाण्याचा काहीही धोका नाही. देशात असे एकही उदाहरण दिसलेले नाही. गेल्या वर्षी कोरोना काळात देशी चिकन खाल्ल्याने उलट रोगप्रतिकारक शक्‍ती वाढल्याचा अनुभव आहे. आताही लोकांनी भीती न बाळगता देशी चिकन खावे, यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.  - संतोष अंकुश कानडे, अध्यक्ष, देशी पोल्र्टी असोसिएशन, नगर जिल्हा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com