Agriculture news in Marathi, Individual Profit Scheme can be purchased in cash | Agrowon

वैयक्तिक लाभ योजनेच्या वस्तू रोखीने खरेदी करता येणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जुलै 2019

पुणे ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या वर्षी लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर वस्तू खरेदी रोखीने करता येणार आहे. गतवर्षी कॅशलेस व्यवहार करणे बंधनकारक होते, मात्र अनेक शेतकऱ्यांना कॅशलेस व्यवहार करून खरेदी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे शासनाकडून त्यात बदल करून यावर्षी योजनेचा लाभ घेताना रोखीने व्यवहार करण्यास मुभा देण्यात आली आहे.

पुणे ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या वर्षी लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर वस्तू खरेदी रोखीने करता येणार आहे. गतवर्षी कॅशलेस व्यवहार करणे बंधनकारक होते, मात्र अनेक शेतकऱ्यांना कॅशलेस व्यवहार करून खरेदी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे शासनाकडून त्यात बदल करून यावर्षी योजनेचा लाभ घेताना रोखीने व्यवहार करण्यास मुभा देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना कृषी योजनेतील खरेदीसाठी कॅशलेस पद्धतीने व्यवहार करणे अनिवार्य केले होते. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या स्वतःच्या बँक खात्यातून पैसे विक्रेत्याला द्यावे लागत होते. त्यासाठी एनएफटी, आरटीजीएस, डीडी किंवा चेकद्वारे व्यवहार करण्याची आवश्यकता होती. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे ई-पेमेंटची सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या. याशिवाय खरेदीची किंमत काही वेळा कमी असल्याने विक्रेत्यांकडून चेक न स्वीकारण्याचे प्रकार झाले होते. तर काही शेतकऱ्यांकडून उधारीवर खरेदी केली जाते. त्यामुळे कॅशलेस पद्धतीचा वापर शक्य होत नव्हते, परिणामी, थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना अनुदान देता येत नव्हते. हे टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांची होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी शासनाकडून रोखीने व्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा कृषी विभागाला डीबीटी योजनेसाठी ८ कोटींचा निधी उपलब्ध असून, शेतकऱ्यांना योजनाचा फायदा घेण्यासाठी १५ जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहेत. या वर्षी ऐकूण तेरा अवजारे डीबीटीद्वारे दिली जाणार आहेत. सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पंचायत समितीमध्ये अर्ज उपलब्ध आहेत. मोटार पंपसंच, डिझेल इंजिन पंपसंच, पीव्हीसी पाइप, बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेपंप, स्प्रेपंप ऑइल इंजिनसह, प्लॅस्टिक क्रेटस, प्लॅस्टिक ताडपत्री, सरी रिजर ट्रॅक्टरचलित, इलेक्ट्रॉनिक कडबाकुट्टी यंत्र मोटारसह या वस्तू वैयक्तिक लाभाच्या योजनेमधून देण्यात येणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...