जळगाव ः खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव
अॅग्रो विशेष
इंडो-डच फूल संशोधन प्रकल्पाला गती
इंडो-डच प्रकल्पांतर्गत राज्य कृषी पणन मंडळाच्या तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेमध्ये उभारण्यात येत असलेल्या ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ प्रकल्पाला गती मिळाली आहे.
पुणे ः इंडो-डच प्रकल्पांतर्गत राज्य कृषी पणन मंडळाच्या तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेमध्ये उभारण्यात येत असलेल्या ‘सेंटर फॉर एक्सलन्स’ प्रकल्पाला गती मिळाली आहे.
कोरोना संकटामुळे रेंगाळलेल्या प्रकल्पात विविध फुलांच्या लागवडीला प्रारंभ झाला असून, येत्या सहा महिन्यांत प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वास पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी व्यक्त केला आहे. या प्रकल्पासाठी नेदरलॅण्ड सरकारच्या तांत्रिक सहकार्य आणि केंद्र सरकारकडून १२ कोटी, तर पणन मंडळाने तीन कोटींचा निधी उपलब्ध आहे.
डच तंत्रज्ञानाने आणि भारतीय तंत्रज्ञानाने फुलांची पॉलिहाउसमधील आणि प्रक्षेत्रावर केलेल्या लागवडीचा तुलनात्मक अभ्यास आणि संशोधन होणार आहे. यामध्ये डच तंत्रज्ञानानुसार कमीत कमी पाणी आणि निविष्ठांचा वापर करून फुलांचे उत्पादन घेतले जाणार आहे. यासाठी एक एकरावर डच तंत्रज्ञानाने संपूर्णतः स्वयंचलित असणारे अत्याधुनिक पॉलिहाउस आणि भारतीय तंत्रज्ञानाचे पॉलिहाउस उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.
तर तेवढ्याच क्षेत्रावर उघड्या जागेवर प्रक्षेत्रावर गुलाब, जरबेरा, बर्ड ऑफ पॅरेडाइज, हेलीकोनिया, कार्नेशन, निशिगंधाच्या लागवडीला प्रारंभ झाला आहे. या विविध वाणांवर विविध वातावरणांत आणि तंत्रज्ञानाचा कोणता परिणाम होतो आणि कोणते उत्पादन दर्जेदार होते. याचा अभ्यास केला जाणार आहे. या अभ्यासामध्ये शेतकऱ्यांना सहभागी आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. विविध चाचण्या यशस्वी झाल्यानंतर हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर वापरण्यास देण्यात येणार आहे. असे पवार यांनी सांगितले.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- संपूर्णतः स्वयंचलित तंत्रज्ञान प्रकल्प
- कमीत कमी मनुष्यबळाचा वापर
- डच आणि भारतीय तंत्रज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास
- कमीत कमी पाणी आणि निविष्ठांचा वापर
- कीड, रोगांचे जैविक व्यवस्थापन तंत्रज्ञान
- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी संलग्न उत्पादन
- 1 of 691
- ››