इंडोनेशियातून पामतेल निर्यातीत साडेसात टक्क्यांनी घट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
जकार्ता, इंडोनेशिया ः उत्पादनात झालेली वाढ अाणि जागतिक बाजारपेठेत वनस्पती तेलाचा कमी पुरवठा असूनही इंडोनेशियातील पामतेल निर्यातीत ७.५ टक्क्यांनी घट झाली असल्याचे दिसून अाले अाहे.
 
सप्टेंबरमधील पामतेल निर्यात २.७६ दशलक्ष टनांपर्यंत खाली अाली अाहे, अशी माहिती इंडोनेशिया पामतेल संघटनेचे सरचिटणीस तोगार सितांगगांग यांनी दिली अाहे.
 
इंडोनेशिया पामतेल उत्पादन अाणि निर्यातीत जगात अाघाडीवर अाहे. मात्र, गेल्या काही दिवसांत निर्यातीत घट झाली अाहे. विषेषतः चीन अाणि भारतात होणारी निर्यात घटली असल्याचे पामतेल संघटनेने म्हटले अाहे.
 
पालतेल संघटनेचे सितांगगांग यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडोनेशियातून चीनमध्ये होणारी पामतेल निर्यात १७.५ टक्क्यांनी घटली अाहे. चीनमध्ये सप्टेंबरमध्ये ३,७०,४७० टन निर्यात झाली अाहे. तसेच भारतातील निर्यात १७ टक्क्यांनी कमी झाली अाहे. भारतात सप्टेंबरमध्ये ६,५०,७५० टन पामतेल निर्यात झाली अाहे.
 
मात्र, पश्चिम अाशियाई देश, पाकिस्तान अाणि युरोपीय देशांत पामतेल निर्यात वाढली अाहे. पश्चिम अाशियाई देशांत २६ टक्के, पाकिस्तानमध्ये ९ टक्के अाणि युरोपीय देशांत १ टक्क्याने निर्यातीत वाढ झाली अाहे. या देशांत अनुक्रमे १,८८,४०० टन, २,११,५२० टन अाणि ४०,०८९० टन निर्यात झाली असल्याची माहिती त्यांनी दिली अाहे.
 
पामतेल उत्पादनात दोन टक्क्यांनी वाढ
इंडोनेशियातील पामतेल उत्पादनात सप्टेंबरमध्ये २ टक्क्यांनी वाढ होऊन उत्पादन ४.०३ दशलक्ष टनांवर पोचले अाहे. यंदाच्या वर्षातील सप्टेंबरमध्ये झालेले उत्पादन सर्वाधिक अाहे. तसेच पामतेलसाठ्यात ८.५ टक्क्यांनी वाढ होऊन तो २.९२ दशलक्ष टनांवर पोचला अाहे, अशी माहिती पामतेल संघटनेने दिली अाहे.
 
सोयाबीन तेल उत्पादनात घट
पामतेलाचे दर वधारले
दक्षिण अमेरिकेत सोयाबीन तेल उत्पादनात घट झाली अाहे. यामुळे सप्टेंबर महिन्यात कच्च्या पामतेलाच्या दरात वाढ होऊन ते सरासरी प्रतिटन ७२४.९ डॉलरवर पोचले अाहेत. अाॅगस्टमध्ये कच्च्या पामतेलाचे दर प्रतिटन ६७६ डॉलर एवढे होते. त्यात अाता ७ टक्क्यांनी वाढ झाली अाहे.
 
इंडोनेशियातून सप्टेंबरमधील पामतेल निर्यात
 
देश निर्यात (टन) घट (टक्के)
चीन ३,७०,४७० १७.५
भारत ६,५०,७५० १७

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com