इंदूर सर्वांत स्वच्छ शहर; भोपाळ स्वच्छ राजधानी, छत्तीसगडची सर्वोत्तम कामगिरी

इंदूर सर्वांत स्वच्छ शहर; भोपाळ स्वच्छ राजधानी, छत्तीसगडची सर्वोत्तम कामगिरी
इंदूर सर्वांत स्वच्छ शहर; भोपाळ स्वच्छ राजधानी, छत्तीसगडची सर्वोत्तम कामगिरी

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील इंदूर शहराला देशातील सर्वांत स्वच्छ शहर म्हणून सलग तिसऱ्यांदा मान मिळाला आहे. राजधानीच्या श्रेणीत भोपाळ शहराची, तर छत्तीसगडला स्वच्छतेच्या कामात सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून निवडण्यात आले.  भारत सरकारच्या वतीने स्वच्छता सर्व्हेक्षण-२०१९ पुरस्कार आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सुमारे ७० श्रेणीतील स्वच्छ शहरांच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. देशातील सर्वांत स्वच्छ शहराच्या श्रेणीत इंदूरनंतर छत्तीसगडच्या अंबिकापूर शहराची निवड झाली. कर्नाटकातील म्हैसूर हे तिसऱ्या स्थानावर आहे. दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या श्रेणीत अहमदाबाद, तर पाच लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणारे उज्जैन स्वच्छ शहर म्हणून पहिल्या स्थानावर राहिले. छत्तीसगडचे नगरविकास मंत्री डॉ. शिवकुमार डहरिया यांनी राष्ट्रपतींकडून सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार प्राप्त केला. स्वच्छतेच्या दिशेने सर्वांत वेगाने आणि नियोजनबद्ध काम केल्याने छत्तीसगड राज्याला हा पुरस्कार देण्यात आला. छत्तीसगडच्या विविध नगरपालिकांनादेखील वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कार मिळाले आहेत. रायपूर महानगरपालिकेचे महापौर प्रमोद दुबे यांनी छत्तीसगडसाठी ही मोठी गौरवाची बाब असल्याचे म्हटले आहे. २०१९ च्या स्वच्छता सर्व्हेक्षण पुरस्कारासाठी दिल्लीतून गेलेल्या पथकाने छत्तीसगडमध्ये बराच काळ अभ्यास केला. आठवड्यापेक्षा अधिक काळ वेगवेगळ्या क्षेत्रांचे सर्व्हेक्षण केले. शहर विकास मंत्रालयाच्या वतीने देशातील वेगवेगळ्या राज्यांतील ४ हजार २३७ शहरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या श्रेणीतील रॅकिंग जाहीर करण्यात आली. सत्तर श्रेणीत पुरस्काराचे वितरण स्वच्छता सर्व्हेक्षण-२०१९ नुसार ७० श्रेणीत पुरस्कार दिले. सर्वांत स्वच्छ शहराबरोबरच स्टार रॅकिंग, झिरो वेस्ट मॅनेजमेंटचा पुरस्कारदेखील इंदूरला मिळाला. मध्य प्रदेशला एकूण १९ पुरस्कार मिळाले. सर्व्हेक्षणात सर्वांत उच्च स्थानावर असलेल्या इंदूरला स्वच्छतेसाठी विशेष अनुदान मिळणार आहे. गेल्या वर्षी इंदूरला २० कोटी रुपये मिळाले होते. उत्कृष्ट स्वच्छतेचे राज्य छत्तीसगड केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या माहितीनुसार, छत्तीसगड, झारखंड आणि महाराष्ट्र राज्यदेखील स्वच्छतेच्या संदर्भात वेगाने विकसित होत आहेत. या तिन्ही राज्यांना बेस्ट परफॉर्मिंग स्टेटस पुरस्कार मिळाले आहेत. छत्तीसगड आघाडीवर आहे, तर दुसऱ्या स्थानावर झारखंड आणि नंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. इंदूरचे वैशिष्ट्ये पाच वर्षांपूर्वी इंदूर स्वच्छतेबाबत १४९ व्या स्थानावर होते. मात्र, आज स्वच्छता हा शहराचा ब्रॅंड बनला आहे. स्वच्छतेत देशात पहिल्या स्थानावर आलेल्या इंदूरला देशातील ३०० शहराच्या प्रतिनिधींनी भेट दिली असून, त्यांनी स्वच्छतेच्या कार्यप्रणालीचे अध्ययन केले आहे. शंभराहून अधिक महानगरपालिकांनी इंदूरचा अभ्यास केला आहे. यात जम्मू -काश्‍मीरपासून चेन्नई, पुणे, बंगळूर, जयपूर आदींचा समावेश आहे. स्वच्छता पुरस्कार

  • सर्वाधिक स्वच्छ शहर : इंदोर
  • सर्वांत स्वच्छ राजधानी : भोपाळ
  • सर्वांत मोठे स्वच्छ शहर : अहमदाबाद
  • मध्यम लोकसंख्येचे शहर : उज्जैन
  • सर्वांत छोटे स्वच्छ शहर : एनडीएमसी दिल्ली
  • सर्वांत स्वच्छ कॅन्टोन्मेंट : दिल्ली कॅन्टोन्मेंट
  • गंगा नदीवरील स्वच्छ शहर : गौचर, उत्तराखंड
  • वेगाने विकसित होणारे मध्यम शहर : मथुरा- वृंदावन
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com