Agriculture news in marathi Industrialist minister realize the need for silk weaving | Agrowon

उद्योगमंत्र्यांनी जाणली रेशीम धागानिर्मितीची गरज

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 जानेवारी 2020

औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन, विक्रीची अडचण व रोजगार निर्मितीच्या दृष्टीने रेशीम धागा निर्मितीचे अर्थशास्त्र राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी (ता. २०) जाणून घेतले. तसेच त्यांनी रेशीम धागा निर्मिती प्रकल्पा अस्तित्वात आणण्यासंबंधी सकारात्मकता दाखविली.

औरंगाबाद : जिल्ह्यात रेशीम कोषाचे उत्पादन, विक्रीची अडचण व रोजगार निर्मितीच्या दृष्टीने रेशीम धागा निर्मितीचे अर्थशास्त्र राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी (ता. २०) जाणून घेतले. तसेच त्यांनी रेशीम धागा निर्मिती प्रकल्पा अस्तित्वात आणण्यासंबंधी सकारात्मकता दाखविली.

औरंगाबाद येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी रेशीम उद्योगाविषयी बैठक घेतली. जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपसंचालक दिलीप हाके, उद्योग विभागाचे सहसंचाल बी. एस. जोशी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के. जी. डेकाटे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

चौधरी व हाके यांनी औरंगाबाद जिल्ह्यात रेशीम धागा निर्मिती प्रकल्पाची गरज काय, याविषयी सादरीकरण केले. पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबाद जिल्ह्याची ओळख असल्याने जिल्ह्यातील अजिंठा व वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी पाहण्यासाठी देशविदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. जिल्हाधिकारी यांनी रेशीम प्रकल्पासाठी दिलेल्या २५ एकर जागेवर विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राचा विकास कार्यक्रमांतर्गत रेशीम शेतकरी प्रशिक्षण व संशोधन केंद्र अंडीपुंज निर्मिती केंद्र, चॉकी केंद्र व फार्मसाठी २७ कोटीचा निधी मंजूर आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी म्हैसूर, बेंगलोर येथे जावे न लागता येथेच चांगले प्रशिक्षण देण्याची सोय होणार आहे. 

अंडीपुंज निर्मिती केंद्रामुळे उच्च दर्जाच्या अंडीपुंजापासून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस चालना मिळून मोठ्या प्रमाणात शेतकरी उद्योगास जोडला जाऊन रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे. २०१४-१५ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम उद्योग प्रायोगिक तत्त्वावर औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यामध्ये राबविण्यात आला. येथे मनरेगा योजनेतून रेशीम उद्योगाला चालना मिळाल्याने मोठ्या प्रमाणात तुतीची लागवड झाली. 

जिल्ह्यातील कोष इतर राज्यात विक्रीला जात असून पैठण व येवला येथील विणकरांना रेशीम धागा इतर राज्यातून आयात करावा लागत आहे. एकही रिलिंग केंद्र नसल्याने औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणारे कोष रामनगरम किंवा जालना येथे विक्रीसाठी जात असल्याने जिल्ह्यातील रोजगार गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर दोन सहा बेसीन मल्टी एंड रिलिंग केंद्र उभारण्याची गरज असल्याचे सादरीकरणातून स्पष्ट करण्यात आले. या प्रकल्पाविषयी उद्योगमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविल्याने लवकरच हा प्रकल्प अस्तित्वात येईल, अशी आशा व्यक्‍त केली जात आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...