बांबू प्रक्रिया संशोधनावर भर देऊन उद्योगनिर्मिती

कोकणातील बांबू प्रजातींच्या प्रक्रिया संशोधनावर भर देऊन उद्योगनिर्मिती करण्याचे प्रयत्न डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुरू केले आहे.
Industrialization with an emphasis on bamboo processing research
Industrialization with an emphasis on bamboo processing research

दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील बांबू प्रजातींच्या प्रक्रिया संशोधनावर भर देऊन उद्योगनिर्मिती करण्याचे प्रयत्न डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुरू केले आहे. बांबू, कळक विकण्यापेक्षा उदबत्तीच्या काडीसाठी त्याचा उपयोग केल्यास जास्त फायदा होईल, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

भारतात ७०० कोटींच्या अगरबत्ती काड्या चीन व व्हिएतनाम या देशातून आयात केल्या जात आहेत. आपल्या देशाची मागणी आपणच पूर्ण करण्यासाठी वनशास्त्र महाविद्यालय, दापोली येथे २०२० मध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन हाती घेण्यात आले आहे. स्थानिक बांबूच्या प्रजातीपासून काड्या काढण्यासाठी मशिनरी खरेदी करण्यात आल्या असून त्यासाठी बांबू हॅण्ड स्प्लीटर, बांबू स्टीक मेकिंग, बांबू स्टीक सिझनिंग मशिन, अगरबत्ती मसाला अ‍ॅप्लीयर, अगरबत्ती मसाला मिक्सर, बांबू क्रॉस कटिंग मशिन या मशिनचा वापर करण्यात येत आहे.

मानगा व मेष बांबूच्या प्रजातीच्या काड्या तयार करून त्याच्या वापराकरीता आयटीसी कंपनीकडून (मंगलदीप अगरबत्ती) चाचणी करण्यात आली. या काड्यांचा दर्जा उत्तम असल्याचे सिद्ध झाले असून आयटीसी कंपनीकडून या काड्यांची मागणी करण्यात आली आहे.

वनशास्त्र महाविद्यालयातील शास्त्रज्ञ डॉ. अजय राणे, डॉ. व्ही. डी. त्रिपाठी, वनशास्त्र महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता, डॉ. मुराद बुरोंडकर यांनी शास्त्रीय अभ्यास करुन काड्यांना अत्तर व मसाला लावून वनशास्त्र महाविद्यालयाने पहिल्यांदाच हाती घेतलेल्या संशोधनातून खनावाची अगरबत्ती काडी तयार केली आहे.

या अगरबत्तीचे उद्घाटन स्त्री शक्तीचा आदर करणारा दिवस म्हणजे ८ मार्च २०२१ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. सौ. इंदू सावंत, माजी संचालक, (एनआरसी) यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कार्यानुभव अभ्यासक्रमामध्ये सुद्धा या प्रशिक्षणाचा समावेश करण्यात येणार आहे. अगरबत्ती निर्मिती व काडी निर्मिती या प्रकल्पाकरिता शिक्षण संचालक, डॉ. सतीश नारखेडे यांनी केंद्र सरकारमधून निधी उपलब्ध करून देण्यास मदत केली.

प्रशिक्षण, मार्गदर्शन भविष्यात या व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या लाभार्थींना वनशास्त्र महाविद्यालय, दापोली यांच्याकडून अगरबत्ती काड्या निर्माण करण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा प्रकल्प संशोधन संचालकांच्या मार्फत परिभ्रमण निधीतून उद्योग निर्मितीसाठी चालविण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com