उद्योगांना स्वस्त दरात वीज देणार ः उद्योगमंत्री देसाई

Industries to provide electricity at affordable rates: Minister Desai
Industries to provide electricity at affordable rates: Minister Desai

मुंबई ः उद्योजकांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने औद्योगिक विकास महामंडळाने वीज वितरणाचा परवाना थेट घ्यावा, असा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. यामुळे उद्योगांना स्वस्तात वीज देणे शक्य होईल. तसेच, उद्योगांसाठीचे विजेचे दर कमी होतील, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी (ता. १३) विधान परिषदेत दिली.

राज्यात आर्थिक राजधानी मुंबईसह ठाणे, रायगड आणि विदर्भातील नागपूर या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांत वाढत्या खासगीकरणामुळे अनेक मोठमोठे उद्योग बंद पडत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण पावसकर यांनी उद्योग आणि बेरोजगारी संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांवर अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये उद्योगांसाठीच्या वीजदारात ३० ते ४० टक्क्यांचा फरक आहे. यामुळे महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जातात, असे त्यांनी सांगितले. मोठ्या उद्योगांपेक्षा लघुउद्योगातून जास्त रोजगारनिर्मिती होते, त्यामुळे लघुउद्योगांना प्रोत्साहन देणे हे राज्य सरकारचे धोरण आहे. सरकार शेतीपूरक, वस्त्रोद्योग आणि इतर उद्योगांना चालना देत आहे. यासाठी राज्य सरकारने अनेक सुधारणा केल्या आहेत, असे देसाई यांनी सांगितले. 

या लघुउद्योजकांना कर्जासाठी बँकांचे खेटे पडू नयेत यासाठी पत हमी सरकारने घेतली आहे, असेही देसाई म्हणाले. केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार योजनेच्याही मर्यादा आहेत, त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री रोजगार योजना राबवली जात आहे, असे त्यांनी सांगितले. भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देणारा कायदा आगामी पावसाळी अधिवेशनात आणला जाईल, थेट कामगारांप्रमाणेच कंत्राटी कामगारांची माहिती देणे आस्थापनांना अनिवार्य असेल अशी तरतूद या कायद्यात करण्यात येईल, असेही देसाई म्हणाले. 

बेरोजगारी वाढल्याचा आरोप फेटाळला या वेळी उद्योगमंत्र्यांनी बेरोजगारी वाढल्याचा आरोप फेटाळून लावला. राज्यात एकूण २०० आयटी पार्क आहेत, त्यापैकी ११० आयटी पार्क एकट्या मुंबईतच आहेत. यातून मोठा रोजगार मिळाला आहे. मुंबईत वाढत जाणारी लोकसंख्या लक्षात घेता, रासायनिक आणि अवजड उद्योग बाहेर गेले असले तरी त्या जागेवर, अन्य उद्योग सुरू झाले असून त्यातून दुपटीने रोजगारनिर्मिती झाल्याचा दावा सुभाष देसाई यांनी या वेळी केला. केंद्र सरकारने वारंवार धोरणे बदलल्यामुळे परदेशी गुंतवणुकीला खीळ बसली त्याचा परिणाम राज्यावरही झाला, अशी टीका त्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com