राज्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या घटत असताना आठ-पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत म
ताज्या घडामोडी
सांगलीत ‘पीएम किसान’च्या अपात्र लाभार्थ्यांकडून ४ कोटी ४१ लाख रुपये वसूल
पंतप्रधान किसान योजनेतील जिल्ह्यातील ५ हजार १२६ प्राप्तिकर भरणाऱ्या व्यक्तीकडून ४ कोटी २३ लाख ६ हजार तर अपात्र ठरलेल्या ३६४ व्यक्तींकडून १८ लाख ६२ हजार, अशी एकूण ४ कोटी ४१ लाख ६८ हजार रुपये वसूल केले.
सांगली : पंतप्रधान किसान योजनेतील जिल्ह्यातील ५ हजार १२६ प्राप्तिकर भरणाऱ्या व्यक्तीकडून ४ कोटी २३ लाख ६ हजार तर अन्य प्रकारे अपात्र ठरलेल्या ३६४ व्यक्तींकडून १८ लाख ६२ हजार, अशी एकूण ४ कोटी ४१ लाख ६८ हजार रुपये वसूल केले आहेत. उर्वरित प्राप्तिकर आणि अपात्र लाभार्थ्यांनी आपल्याकडील पंतप्रधान किसान योजनेतील जमा पैसे त्वरित भरावेत, अशा नोटिसा प्रशासनाने दिल्या आहेत.
केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू आहे. या योजनेतंर्गत गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी प्रतिवर्षी सहा हजार रुपयांना निधी चार महिन्याच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या स्वरूपात बॅंक खात्यावर जमा केला जातो.
सांगली जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ४ लाख ५८ हजार १९० लाभार्थ्यांची नोंदणी झाली होती. १२ हजार ९४१ प्राप्तिकर भरणाऱ्यांची यादी शासनाकडून पोर्टलवर मिळाल्याचे स्पष्ट झाले. किसान योजनेंतर्गत आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर १० कोटी ३९ लाख रुपये भरले होते.
त्यापैकी प्राप्तिकर भरणाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटिसा जाताच जिल्ह्यातील ५ हजार २२६ लाभार्थ्यांनी ४ कोटी २३ लाख ६ हजार भरले. उर्वरित आयकर भरणाऱ्यांनाही प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. जिल्ह्यातील ४ हजार ३४५ अपात्र लाभार्थींच्या खात्यावर २ कोटी १७ २४ लाख रुपये जमा केले होते. त्यापैकी ३६४ लाभार्थ्यांनी १८ लाख ६२ हजार रुपये शासनाच्या खात्यावर जमा केले आहेत. आता उर्वरित अपात्र आणि आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांना नोटिसा पाठविल्या असून, रक्कम भरण्यासाठी तालुका पातळीवर काम सुरू आहे.
- 1 of 1053
- ››