परभणीतील अपात्र शेतकऱ्यांकडून ‘शेतकरी सन्मान’चे २२ लाख वसूल

परभणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम- किसान) योजनेअंतर्गत सात तालुक्यांतील २२७ अपात्र (आयकरदात्या) लाभार्थींकडून अनुदानाची २२ लाख ६ हजार रुपये रक्कम परत करण्यात आली.
From ineligible farmers in Parbhani 22 lakh recovery of 'Shetkari Sanman'
From ineligible farmers in Parbhani 22 lakh recovery of 'Shetkari Sanman'

परभणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम- किसान) योजनेअंतर्गत सात तालुक्यांतील २२७ अपात्र (आयकरदात्या) लाभार्थींकडून अनुदानाची २२ लाख ६ हजार रुपये रक्कम परत करण्यात आली, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

कृषी सहाय्यक, तलाठी यांच्यामार्फत योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. जिल्ह्यात एकूण ४ लाख ६४ हजार ७८३ शेतकरी खातेदार आहेत. त्यातून पीएम किसानसाठी प्राथमिक पात्रताधारक ३ लाख ९ हजार ३५३ शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यापैकी ६ हजार  ६७० शेतकऱ्यांनी नावे स्वतः अपलोड केली. त्यांना मंजुरी देणे बाकी आहे.

एकूण ३ हजार ८६३ शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकात चुका आहेत. त्यामुळे ती प्रकरणे प्रलंबित आहेत. तर, २ हजार ४२ शेतकऱ्यांचे आधार क्रमांक अवैध आहेत. एकूण २३ हजार २३६ शेतकऱ्यांची माहिती दुरुस्तीसाठी उपलब्ध आहे.

लाभार्थी  शेतकऱ्यांच्या खात्यावर आजवर प्रत्येकी दोन हजार रुपयाचे सहा हप्ते जमा करण्यात आले. त्यामध्ये २ लाख ९० हजार ३५५ लाभार्थींच्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात आला. दुसरा हप्ता २ लाख ७७ हजार ३०२ लाभार्थींच्या  खात्यांवर, तिसरा हप्ता २ लाख ८० हजार ९० लाभार्थींच्या, चौथा हप्ता २ लाख ३७ हजार ४९३ लाभार्थींच्या, पाचवा हप्ता १ लाख ९७ हजार ४१ लाभार्थींच्या, सहावा हप्ता ८८ हजार ६३१ लाभार्थींच्या खात्यांवर जमा करण्यात आला. 

दरम्यान, जिल्ह्यातील नऊ तालुक्यात एकूण ४ हजार ६७८ लाभार्थी आयकर दाते तसेच अन्य ६३ लाभार्थी अपात्र असल्याचे आढळून आले. त्यांच्या खात्यांवर ४ कोटी २४ लाख १६ हजार रुपये जमा करण्यात आले. अपात्र असल्यामुळे त्यांना खात्यावर जमा झालेली अनुदानाची रक्कम सरकारला परत करण्यासाठी नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com