हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनवर काळ्या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव

हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनवर काळ्या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनवर काळ्या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील केलसुलासह (ता. सेनगाव) परिसरातील दोन गावांतील सोयाबीन पिकांवर पाने खाणाऱ्या काळ्या भुंगेऱ्यांचा (ब्लॅक विव्हिल) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला आहे. 

ही सोयाबीन पिकावरील नियमित वा मुख्य कीड नाही. यापूर्वी ती अत्यंत किरकोळ स्वरूपात आढळली आहे. मात्र कीड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत सर्वेक्षण करताना केलसुला आणि परिसरातील सोयाबीन पिकांवर या काळे भुंगेऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. या किडीने सोयाबीनची पाने खाऊन टाकल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शुक्रवारी (ता. १६) उपविभागीय बळिराम कच्छवे, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. भेदे यांच्यासह कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने केलसुला येथील प्रादुर्भावग्रस्त सोयाबीनच्या पिकांची पाहणी केली. 

डॉ. भेदे म्हणाले, ‘‘सोयाबीनमध्ये ही कीड एरवी आढळत नसल्याने त्याचे नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकांचे या किडीसाठी लेबल क्लेम्स नाहीत. मात्र थायामेथोक्झाम, लॅंबडा सायहॅलोथ्रिन या संयुक्त कीटकनाशकाच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत.’’  

‘‘काळे भुंगेरे या किडीची शास्त्रीय ओळख वा सिद्धता पूर्ण होण्यासाठी बंगळूर येथील एनबीएआयर, नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेकडे कीटकाचे नमुने पाठविण्यात येणार आहेत,’’ असेही डॉ. भेदे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com