Agriculture news in marathi, Infection of sugarcane seedlings due to lack of labor on the banks of Krishnakatha | Page 4 ||| Agrowon

कृष्णाकाठावर मजुरांअभावी ऊस रोपांची लागण

टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

भिलवडी, जि. सांगली ः कृष्णाकाठावर उसाच्या कांडी लावणीस फाटा देत रोप लावणीस शेतकरी वर्ग प्राधान्य देत आहे. मजुरीच्या वाढत्या दरामुळे त्याकडे कल वाढल्याचे चित्र आहे.

भिलवडी, जि. सांगली ः कृष्णाकाठावर उसाच्या कांडी लावणीस फाटा देत रोप लावणीस शेतकरी वर्ग प्राधान्य देत आहे. मजुरीच्या वाढत्या दरामुळे त्याकडे कल वाढल्याचे चित्र आहे.

नदीकाठावर पारंपरिक आडसाली, सुरू, पूर्वहंगामी, अशा तीन टप्प्यात ऊस लावण होते. जून-जुलैमध्ये आडसाली लावण होते. त्याची तोडणी चौदा-पंधरा महिन्यांत होते. त्या पिकास दोन पावसाळी हंगाम मिळाल्याने वाढ चांगली होते. टनेजही वाढते. तोडणी लवकर झाल्याने ऊसबिल तत्काळ पदरात पडते. काही शेतकरी खरिपाचे सोयाबीनचे पीक घेऊन सुरू, पूर्वहंगामी लावण करतात. यामध्ये पुढील पिकास चांगला बेवड मिळतो. नव्याने जमिनीच्या सऱ्या सोडाव्या लागत नाहीत. सोयाबीनच्या उत्पन्नाचे पैसे पुढील लागवडीसाठी हाती येतात.

सध्या कांडी लावणीसाठी एकरी साडेचार ते पाच हजार रुपये मजुरी आहे. यामध्ये बियाणे तोडून कांडी लावण करून दिली जाते. कट वाकुरीसाठी सोळाशे ते अठराशे, बियाणे वाहतुकीसाठी वाढीव मजुरी आकारली जाते. महागाईच्या नावाखाली दर वर्षी त्यामध्ये वाढ होत आहे. ऊस बियाणांचा दर गुंठ्यास पाच ते आठ हजार रुपये आहे. एक ते दीड गुंठे बियाणे एकर लावणीसाठी लागते. हा सर्व खर्च पाहता एकर ऊस लावणीसाठी सुमारे बारा ते पंधरा हजार खर्च होतो. या उलट तेवढ्याच खर्चात रोप लावण होते.

चार फुटी सरी, रोपामध्ये दीड ते दोन फुटांचे अंतर राखल्यास एकरी पाच ते सहा हजार रोपे लागतात. त्याच्या लावणीसाठी एक ते दीड खर्च येतो. सध्या नदीकाठावर मोठ्या प्रमाणात ऊस नर्सरी आहेत. एक रुपया सत्तर पैसे ते दोन रुपये चाळीस पैसे, असा रोपाचा दर आहे. काही नर्सरी रोपे पोहोच करण्याबरोबर त्याची लावणीही करून देत आहेत. शेतास पाणी दिले की दुसऱ्या दिवशी रोपे लावली जातात.

दिवसाकाठी चार-पाच एकर क्षेत्रात रोप लावण केली जात आहे. रोपे सेट होण्यासाठी खते, टॉनिक, कीटकनाशकाच्या अंतराने दोन-चार आळवणी, फवारणी घ्याव्या लागतात. रोपांनी चांगली मुळे धरल्यानंतर वाढ जोमाने होते. वाढते मजुरीचे दर, ऊस लागवडीमध्ये नवी पद्धत यामुळे तरुण शेतकरी वर्गाचा रोप लावणीकडे कल वाढत आहे.


इतर बातम्या
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
वीज प्रश्नांवर मार्ग काढू : भुजबळनाशिक : ‘‘शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी...
तूर डाळ शंभरी गाठणार नागपूर ः खरीप पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
जळगाव, अमळनेर, चोपडा बाजारात मक्याचे दर...जळगाव ः  जिल्ह्यातील जळगाव, चोपडा व...
बीटी वांगी लागवडीसाठी १७...पुणे ः जनुकीय परावर्तित (जीएम) बियाणे बंदी...
मनमाडमध्ये वाढत्या थंडीमुळे दूध...मनमाड, ता. नांदगाव : गेल्या काही दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जाची मर्यादा...सोलापूर ः शेतीचे अपेक्षित उत्पन्न आणि हवामानाचा...
जळगावात ‘वाळू माफियाराज’जळगाव ः जिल्ह्यात विशेषतः जळगाव तालुक्यातील सर्वच...
जळगाव जिल्ह्यात ओल्या दुष्काळाच्या...जळगाव ः  अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे...
दुधाला भाव व बाजारपेठ मिळवून देणार :...वर्धा : ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्था ही...
कोल्हापूर : ‘एफआरपी’चा वाढीव रक्कम न...कोल्हापूर : गेल्या हंगामात तोडणी वाहतूक खर्च कमी...
अकोलाः करपा रोगाचा केळीला फटका पणज, जि. अकोलाः जिल्ह्यात पणज, बोचरा, शहापूर,...
नागपूर : महाज्योतीमार्फत करडईचे ५०...नागपूर : ‘‘महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी...
खतांचे वाढीव दर कमी करा मुंबई : अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी...
भारताच्या फिर्यादीस ऑस्ट्रेलियाकडून...देशांतर्गत ऊस आणि साखर उत्पादकांना करण्यात...
हवामानशास्त्र विभागाचा अंदाज, पारा...  पुणे - दक्षिण कोकणावर गेल्या तीन...
भारतातून सोयापेंड निर्यात घसरली, जाणून...१) दक्षिण कोकणावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून...
साखर निर्यात जोरात ?जानेवारी २०२२ अखेरपर्यंत आणखी ७ लाख टन साखरेची...
पीकविम्यासाठी रविकांत तुपकरांचे मुंडन...बुलडाणा - जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना रिलायन्स...