Agriculture news in marathi Inferior onion seeds on top of farmers | Agrowon

बुलडाणा : कांद्याचे निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

मध्यंतरीच्या काळात कांद्याच्या किमती वाढल्यानंतर लागवडीकडे ओढा वाढला. शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मागणीचा काही व्यापारी, विक्रेत्यांनी जोरदार फायदा घेतला असून, गुणवत्ता नसलेले कांद्याचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले आहे.

बुलडाणा : मध्यंतरीच्या काळात कांद्याच्या किमती वाढल्यानंतर लागवडीकडे ओढा वाढला. शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मागणीचा काही व्यापारी, विक्रेत्यांनी जोरदार फायदा घेतला असून, गुणवत्ता नसलेले कांद्याचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले आहे. या बियाण्याची उगवण न झाल्याने आता शेतकरी फसल्याचे स्पष्ट होऊ लागले.

प्रामुख्याने संग्रामपूर तालुक्यात शेतकऱ्यांना अशा प्रकारचे बियाणे कृषी केंद्रधारकांनी विकले असून, या व्यवहाराची कुठलीही पावती शेतकऱ्यांना दिली नव्हती. या प्रकारामुळे कृषी खात्याची गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा व स्थानिक कृषी अधिकाऱ्यांच्या कामकाजावरच आता प्रश्‍नचिन्ह उभे होऊ लागले आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील कांद्याचे अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे बियाणे मोठ्या प्रमाणात विक्री झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यासह लगतच्या इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही हे बियाणे दिले गेले आहे. बियाणे विक्रीत संबंधित विक्रेत्यांची कोट्यवधीची उलाढाल झाली आहे. या विक्री व्यवहाराची कुठलीही पावती शेतकऱ्यांना दिलेली नाही.

संग्रामपूर तालुक्यात विविध गावात अशा प्रकारचे कांदा बियाणे खरेदी केलेले शेतकरी फसले आहेत. कांदा बियाण्याची उगवण अवघी दहा ते पंधरा टक्के झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. तालुक्यात बियाणे विक्रीचा अशा प्रकारचा गोरखधंदा सुरू असताना कृषी विभागाच्या स्थानिक यंत्रणेने कुठलेही लक्ष दिले नाही. कांदा बियाणे फसवणुकीनंतर या बाबत कुठलाही अधिकारी आता बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करण्याचा सल्ला दिल्या जात आहे. 

सर्वच आलबेल

संग्रामपूर तालुक्यात कांद्याची लागवड किती झाली, यासाठी किती बियाणे व कोणत्या कंपनीचे विक्री झाले याची माहिती कुठेही उपलब्ध नाही. विविध कंपन्यांनी पॅकिंग करून कांद्याचे बियाणे विक्रेत्यामार्फत शेतकऱ्यांना दिले आहे. खरेदीच्या पावत्या नसल्याने शेतकऱ्यांना तक्रारी करण्यास अडचण झालेली आहे तर दुसरीकडे  तक्रार नसल्याने कारवाई करण्यासाठी कृषी यंत्रणा हतबल बनलेली आहे. यात नुकसान शेतकऱ्यांचे झालेले आहे. काही शेतकऱ्यांना विक्रेत्याने परस्पर भरपाई करून दिली आहे. आता तक्रारींचा ओघ वाढत चालल्याने हा प्रकार जिल्हाभर चर्चेत आला आहे. जिल्हास्तरीय कृषी यंत्रणा या बाबत काय कारवाई करते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.


इतर बातम्या
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
तूर विक्रीसाठी ३९८० शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (२०२०-२१) आधारभूत...
लातूर येथे बुधवारी जवस पीक प्रात्यक्षिकपरभणी ः लातूर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र...
कृषी यंत्रणेला तत्पर करणार ः धीरजकुमारऔरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील कृषी विस्तार व...
कृषी विद्यापीठ तंत्रज्ञानाचा वापर करा...नाशिक : शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने कृषी...
नगरमध्ये कावळे ‘बर्ड फ्लू’ बाधितनगर ः श्रीगोंदा तालक्यातील भानगाव शिवारात मृत...
नाशिकमध्ये ‘बर्ड फ्लू’च्या देखरेखीसाठी...नाशिक : राज्यातील विविध भागांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा...
गोसेखुर्दच्या कामात हयगय नको : नितीन...नागपूर : तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटूनही...
ट्रॅक्टर मोर्चाबाबत आज सर्वोच्च...नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत...
पावसमधील आंब्याच्या तीन बागांमध्ये...रत्नागिरी : ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांमध्ये...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे :...नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि...
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कोरोना लसीकरण क्रांतिकारक पाऊल : ...मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक...
सातारा जिल्ह्यात रब्बीची ९५ टक्के...सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे...